पालकांनो सावधान! तुमचे लाड मुलांसाठी घातक; सर्वेक्षणात तब्बल सव्वा लाख मुलांबाबत धक्कादायक माहिती समोर 

over one lac children affected due to over use of mobile in maharashtra
over one lac children affected due to over use of mobile in maharashtra

मेंढला (नरखेड) (जि. नागपूर) : सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखील घासही जात नाही. त्यामुळे पालक त्यांच्या हातात मोबाईल देऊन घास भरवतात.मात्र लहान मुलांचे हे लाड त्यांच्या जीवावर बेतणारे असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात दिसून झाले आहे.

महाराष्ट्रात सुमारे सव्वा लाख मुलांना मोबाईलच्या माध्यमातून आजार झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.त्यामुळे पालकांनो सावधान..!तुमचे लाड मुलांना घातक ठरत असल्याचे सांगण्याची वेळ आली आहे.त्यातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा ऑन लाईन फंडा देखील यात भर घालत असून सुज्ञ पालकांसाठी एक डोकेदुखीचा गंभीर विषय बनला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम अनेक पालकांना माहीत असूनही ते आपल्या मुलांना या व्यसनातून बाहेर काढू शकत नाहीत. मात्र काही गोष्टींची काळजी घेण्याची आज अत्यंत गरज आहे.नाहीतर त्याचे मुलांवर होणारे गंभीर परिणाम याकरिता स्वताला जबाबदार ठरविण्यासाठी सक्षम बनविण्याची तयारी पालकांनाच ठेवावी लागणार आहे हे सांगणे चुकीचे ठरणार नाही.

मोबाईल हे प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मुलांसमोर पालकच जर सतत मोबाईलवर राहिले तर त्याचं अनुकरण मुलंही करतात. मात्र लहान मुलांना समजावून सांगणं हे पालकांचं काम आहे.मोबाईल वापरावर नियम लावले तर मोबाईलचं व्यसन सुटण्यास मदतच होईल. जेवताना, झोपताना, बाहेर खेळताना कटाक्षाने मोबाईलचा वापर टाळावा असा नियमच घरात लावावा तसेच, लहान मुलांनी हातात मोबाईल घेतलाच तरी त्यासाठी वेळ ठरवून द्यावी.जेणेकरून मुलं फारवेळ मोबाईलवर राहणार नाहीत.

महत्वाची बाब असी की सध्यस्थीतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राकडून ऑन लाईन शिक्षणाचा फंडा वापरला जात आहे.मुळता हा व्यावसायिक फंडा देखील मुलांच्या आजारात भर घालत आहे.ऑन लाईन शिक्षण घेत असल्याचा बहाणा करत दिवसभर मुले मोबाईल धरून राहतात.आपला मुलगा ऑन लाईन शिकत आहे असे कौतुक करून पालक सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात.लहान मुलं नेहमीच दुसऱ्यांचं अनुकरण करत असतात. 

मोबाईलचा अतिवापर घातक 

आई-वडील काय करतात, भाऊ-बहिण कसे वागतात याचा लहान मुलांवर परिणाम होत असतो. त्यामुळे जर पालकच सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून राहत असतील तर मुलांनाही मोबाईलचं व्यसन लागणं साहजिकच आहे.त्यामुळे वेळीच पालकांनीही आवर न घातल्याने मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि नाईलाजाने पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो. पण ही सवय अतिशय वाईट आहे हे पालकांनी समजून घ्यायला हवे. एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रॉमॅग्नेटिक रेडिएशनचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते.एकाग्रतेची शून्यता आढळून येते.मानसिक ताण वाढून स्वतःवरील नियंत्रण सुटते.मुलांना मोबाईलच्या अति वापरामुळे टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे.या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.त्याचबरोबर पालकांचा विश्वास बसणार नाही पण

मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊन जीविताला धोका निर्माण होऊ शकतो असे सुद्धा तज्ञांनी सांगितले आहे.असे अनेक आजार मुलांची चिंता वाढवायला कारणीभूत ठरत आहेत.म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराचे लाड थांबवून वेळीच आवर घालणे गरजेचे असून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे पालकांच्या खिशाला कात्री

मला तीन मूल असून त्यात 2 मुली एक मुलगा आहे पहिली मुलगी 12 वीला असल्याने तिला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेणे गरजेचे असल्याचे शिक्षकाकडून सांगण्यात आले ,आणि तिची गरज समजून मी एक मोबाईल घेतला पण दुसरी देखील दहावीला आणि मुलगा 8 वीला असल्याने सर्वांनाच मोबाईल गरज असल्याचे सांगण्यात येत आहे ,मी शेती व्यवसाय करतोय अल्प भूधारक असून जेथे परिवार पोसणे कठीण झाले होते तेथे आता या ऑनलाईन शिक्षणाच्या मोबाईल ची भर म्हणजे माझ्या सारख्या शेतकरी ,शेतमजूर असणाऱ्या वर्गाला खिशाला कात्रीच शासनाने लावली आहे असे काही पालकांचे म्हणणे आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com