कोरोनाचे रुग्ण अवघे १,०२०; जिल्ह्यात गृह विलगीकरणात अडीच हजारांवर रुग्ण

केवल जीवनतारे
Thursday, 5 November 2020

महिनाभर कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करण्यात आलेल्यांची संख्या जास्त आहे. बुधवारी २३४ जण बाधित आढळले तर २९२ जणांनी कोरोनावर मात केली. नागपुरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्‍णांची संख्या आता १,०२० आहे.

नागपूर : कोरोना विषाणूबाबत जनमानसात असलेले भय आता संपले आहे. अवघे १,०२० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उर्वरित अडीच हजार रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत.

मागील महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत मृत्यूदर आणि बाधितांची संख्या खाली आली आहे. जिल्ह्यात २४ तासांमध्ये १० मृत्यू झाले आहेत. यातील शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन असे सहा जण जिल्ह्यातील आहेत.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

उर्वरित मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहेत. रेफरच्या धोरणामुळे नागपुरात त्यांच्या मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी २३४ नवीन बाधितांची भर पडल्याने आजपर्यंत एक लाख तीन हजार ७६ वर बाधितांचा आकडा पोहोचला. तर आठ महिन्यात मृतांचा आकडा तीन हजार ४३९ वर पोहोचला आहे.

नागपुरात मागील आठ महिन्यांत कोरोनाबाधितांचा आकडा लाख पार झाला असला तरी यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या ९६ हजार ८०१ वर पोहोचली आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत सर्वाधिक ९३.१८ टक्के आहे. विशेष असे की, कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील ७७ हजार ०७२, तर ग्रामीण भागातील १९ हजार ७२९ जणांचा समावेश आहे.

अधिक वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

विशेष असे की, मागील महिनाभर कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करण्यात आलेल्यांची संख्या जास्त आहे. बुधवारी २३४ जण बाधित आढळले तर २९२ जणांनी कोरोनावर मात केली. नागपुरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्‍णांची संख्या आता १,०२० आहे.

शहरातील मृत्यू

कोरोनाबाधितांच्या एकूण तीन हजार ४३९ मृत्यूंपैकी शहरातील दोन हजार ४३४ आणि ग्रामीण भागातील मृतांची संख्या ५७७ झाली आहे. जिल्ह्याबाहेरील मृतांचा आकडा ४२८ झाला आहे. मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण नागपुरात सुरू झाल्यानंतर सर्वाधिक १,३७६ मृत्यू सप्टेंबर महिन्यात नोंदवले गेले आहेत.

जाणून घ्या - 'शौक के लिये कुछ भी करेगा'

असे आहेत मृत्यू

  • मेडिकल - १३३३
  • मेयो - १२२१
  • एम्स - १९
  • खासगी रुग्णालय - ८८०
  • जिल्ह्याबाहेरचे मृत्यू - ४२८

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over two and a half thousand patients in home separation in the district