पालघरच्या घटनेबाबत गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, वाचा काय म्हणाले ते... 

The Palghar incident was due to rumors: Anil Deshmukh
The Palghar incident was due to rumors: Anil Deshmukh

नागपूर : तीन महिन्यांपूर्वी पालघरला मॉब लिंचिंगमध्ये दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीकडे या घटनेची चौकशी देण्यात आली होती. संपूर्ण चौकशी केल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. केवळ अफवा पसरल्याने ही घटना घडली होती, असे त्यात म्हणण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (ता. 16) सांगितले. 

याबाबत गृहमंत्र्यांनी सांगितले की, इतर राजकीय पक्षांनी घटनेच्या मुळाशी न जाता राजकीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न त्यावेळी केले. हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्‍चन यांच्यात तणाव कसा निर्माण होईल, असेही प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून करण्यात आले. आज न्यायालयात जे आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्यामध्ये ही घटना केवळ अफवा पसरविल्याने घडल्याचे म्हटले आहे. 

त्यामुळे काही राजकीय पक्षांची भूमिका तेव्हा काय होती, हे लक्षात येते. त्यांना जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी शेकून घ्यायची होती. पण, जनतेने समजुतदारी आणि संयमाचा परिचय देऊन त्यांचे ते इप्सित साध्य होऊ दिले नाही. या चौकशीदरम्या सीआयडीने 808 लोकांना ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली. त्यानंतर 154 लोकांना अटक करण्यात आली. आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तेथेच आता या प्रकरणाचा निर्णय होणार आहे. 

पालघर येथील मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर दशनाम गोसावी (गोस्वामी) समाज पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या समाजातील सामान्य माणूस आजही पालात आणि झोपडीत हलाखीचे जीवन जगतो. हा सामान्य माणूस शिक्षणाच्या प्रवाहात आला तरच अशा मॉब लिंचिंगच्या घटना थांबवता येतील. साधू, संत, महंतावर हल्ला होण्याची पालघरमधील ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही महंतांवर पिसाळलेल्या हिंस्त्र झुंडींनी हल्ले केले आहेत. त्यांना ठेचून मारले आहे. 

9 मे 2012 रोजी नागपूरच्या कळमना-नेताजीनगर परिसरात संशयातून तीन भिक्षेकऱ्यांना ठेचून मारण्यात आले. त्यानंतर नाथजोगी समाज चर्चेत आला. पालात आणि झोपडीत जीवन व्यतित करणारा हा समाज वेष बदलून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो. थोडक्‍यात बहुरूपींसारखे यांचे काम आहे. मे महिन्यातील नागपूरचे उन्ह. त्यावेळी बाईच्या वेशात काही लोक फिरून महिला आणि मुलींवर अत्याचार करतात. अंगाला वंगण लावून येतात. त्यामुळे हाती सापडत नाहीत. अशा अफवा उठल्या होत्या. या समाजावर अशी वेळ का यावी, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याया प्रयत्न केला असता, या समाजात शिक्षणाचा अभाव आणि गुन्ह्यांसाठी कठोर कायदे नसणे, ही बाब पुढे आली आहे. 
 

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com