रुग्णांच्या जिवाशी खेळ... तो रडत रडत म्हणाला, डॉक्टर मला औषध द्या ना, नाही तर मी...

केवल जीवनतारे
Friday, 14 August 2020

दोन दिवसांपासून रुग्णांना वेळेवर औषधाचा डोस मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या जागरुक नातेवाईकाने समता सैनिक दलाकडे तक्रार केली आहे. विशेष असे की, दोन दिवसांपर्वीच एका बऱ्या झालेल्या रुग्णाला मोबाईवरून एका डॉक्टरने या पवित्र व्यवसायाला छेद देणारे वर्तन केले. उर्मटपणे रुग्णांला बोलले.

नागपूर : मेडिकलमध्ये साडेतीनशेवर कोरोनाचे रुग्ण भरती आहेत. त्यांना वेळेवर डोस द्यावा लागतो. परंतु, रुग्णांची वाढती संख्या बघता औषधाचा साठा नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे रुग्णांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर औषध मिळत नसल्याने रुग्णाने डॉक्टरला मागणी केली. मात्र, डॉक्टरने त्यांच्याशी असा अभद्र केल्याचे पुढे आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या मेडिकलच्या डोक्याला ताप ठरत आहे. त्यात औषधसाठा संपल्यामुळे मेडिकलमध्ये रुग्णांना वेळेवर आवश्यक औषधाचा डोस मिळत नसल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली आहे. औषध साठा संपल्यानंतर तात्पुरती सोय म्हणून अधिष्ठातांच्या पुढाकारातून लोकल पर्चेस करण्यात येते.

जाणून घ्या - सतरा महिन्यांत सरपंच झाला नायक!

मात्र, दोन दिवसांपासून लोकल पर्चेसच्या फार्मवर मेडिसीन विभागातील वरिष्ठांकडून स्वाक्षरी करण्यात आली नसल्याची चर्चा रंगली आहे. यामुळेच लोकल पर्चेसचे पेपर अद्याप अधिष्ठातांच्या टेबलवर आले नाही. यामुळे ते कागदपत्र फारमॅकोलॉजी विभागात पोहोचले नसल्याने फारमॅकोलॉजीकडून खरेदीचे आदेश दिल गेले नाही. याचा फटका मात्र कोरोनाबाधित रुग्णांना बसत आहे. दोन दिवसांपासून रुग्णांना वेळेवर औषधाचा डोस मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या जागरुक नातेवाईकाने समता सैनिक दलाकडे केली आहे.

रुग्णांसोबत अभद्र व्यवहार

विशेष असे की, दोन दिवसांपर्वीच एका बऱ्या झालेल्या रुग्णाला मोबाईवरून एका डॉक्टरने या पवित्र व्यवसायाला छेद देणारे वर्तन केले. उर्मटपणे रुग्णांला बोलले. कोरोनाबाधित आपले दुःख व्यक्त करतात. त्यांच्याशी असा अभद्र व्यवहार डॉक्टरांकडून होतो. त्यात औषधाचा डोस वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांच्या जीविताला धोका होण्याची भीती नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन खणखणत होता.

अधिक वाचा -  ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

तक्रार नेहमीचीच

वेळेवर औषध मिळत नसल्याची तक्रार मेडिकलमधील नेहमीची आहे. डॉक्टरांना औषध द्या, असे म्हणावे लागत असल्याची व्यथा एका रुग्णाने फोनवरून बोलून दाखवली. हे वास्तव विचारण्यासाठी अधिष्ठातांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients do not get the dose of the drug on time