फुटपाथ दुकानदारच उभे झाले तुकाराम मुंढेंच्या विरोधात, वाचा काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

आठवड्यात शनिवारी, रविवारी शहरातील सर्वच बाजारांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून कारवाई करण्यात आली. रस्त्यांवरील सर्वच दुकानदारांवर कारवाई केल्याने रोष निर्माण झाला.

नागपूर : शहरातील बाजारांवर कारवाई करणाऱ्या आयुक्तांविरोधात संताप व्यक्त करीत भाजीविक्रेते, फुटपाथ दुकानदारांनी शुक्रवारी मोर्चा काढला. आयुक्त तुकाराम मुंढे व महापालिकेविरुद्ध घोषणाबाजी करीत दुकानदारांनी संविधान चौक दणाणून सोडले. महापौर संदीप जोशी यांना भेटून दुकानदारांच्या शिष्टमंडळाने वेंडर्स ऍक्‍टची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

आठवड्यात शनिवारी, रविवारी शहरातील सर्वच बाजारांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशावरून कारवाई करण्यात आली. रस्त्यांवरील सर्वच दुकानदारांवर कारवाई केल्याने रोष निर्माण झाला. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी 2014 मध्ये केंद्र सरकारने कायदा केला. मात्र, या कायद्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप विविध संघटनांसह नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनीही केला होता.

जाणून घ्या - बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

आयुक्तांच्या या कारवाईविरोधात शुक्रवारी नागपूर जिल्हा पथ विक्रेता संघ, साप्ताहिक बाजार पथ विक्रेता संघ व नॅशनल हॉकर्स फेडरेशनने कॉटन मार्केट चौक ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जमू आनंद, शिरीष फुलझले, पंजू तोतवानी, कविता धीर, विज्जू पठाण, गुड्डू शाहू, मुश्‍ताक अहमद, सतीश भेंडे, लालू लिल्हारे, शहनाज, राजेश बिजेकर, कल्पना दुपारे, ममता ढेंगे यांच्या नेतृत्वातील मोर्चात शेकडो दुकानदार, भाजीविक्रेते उपस्थित होते. यावेळी आयुक्त कायद्याची पायमल्ली करीत असल्याचे वक्‍त्यांनी सांगितले.

मोर्चानंतर दुकानदारांचे शिष्टमंडळ महापौर संदीप जोशी यांना भेटले. दुकानदारांवरील कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. मोर्चात सुरेश गौर, हेमंत पाटमासे, कविता धीर, नरेंद्र पूरी, संजय वर्मा, महेश सुमाटे, इमरान शैख, शेखर वर्मा, शारदा वानखेडे, कल्पना दुपारे, नियाज पठान, मुस्ताक खान, अरविंद डोंगरे, गोपाल गिरी, विजय वानखेडे, शुभम पानतावणे, जगदीश गावंडे, प्रशांत मकोडे, गोविंदा कुंभारे, प्रफुल्ल मेश्राम, इमरान शैख, ललिता पटेल, नंदा जांभुळे, सुशीला वैद्य, रेखा पीरुतकर, पार्वती मेश्राम, धनराज निमजे, प्रकाश कावळे, रोशन मस्के, प्रकाश कलंबे, राधेश्‍याम कलंबे, मकसूद अहमद, प्रकाश गौर, नंदू जैस्वाल, अब्दुल सलीम शैख, नितीन देवरे, अब्दुल वाहिद, इज्जू पठान, महेश मानकर, बाबू खान आदी उपस्थित होते.

काय आहे या लिंकमध्ये? - हॅलोऽऽ हॅलोऽऽ, तुकाराम मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे, सांगता का?

मूठभर श्रीमंतांच्या कार पार्किंगसाठी कारवाई

अतिक्रमण कारवाईच्या नावावर शहरातील मूठभर श्रीमंतांच्या कार पार्किंगसाठी फुटपाथ दुकानदारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप जम्मू आनंद यांनी केला. वेंडर्स ऍक्‍टद्वारे दुकानदारांना संरक्षण आहे. मात्र, आयुक्त कायद्याची पायमल्ली करीत शहरातील गरिबांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचा आरोपही आनंद यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavement shopkeepers' protest against Commissioner Tukaram Mundhe