esakal | दिवाळीमुळे नागरिकांचे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष; आज अवघ्या १६८० चाचण्या 
sakal

बोलून बातमी शोधा

people are ignoring corona testing during diwali festival

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र आताही मेयो, एम्स आणि इतर रुग्णालयांच्या तुलनेत मेडिकलमध्ये कोरोनाचे आताही सर्वाधिक रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर खाली आला आहे,

दिवाळीमुळे नागरिकांचे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष; आज अवघ्या १६८० चाचण्या 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः आठ महिन्यांपासून मनात बसलेली कोरोनाची दहशत दिवाळीच्या आनंदामुळे कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यात कोरोनाचा कहर थांबला. जिल्ह्यात अवघे तीन मृत्यू झाले. तर ८० जण कोरोनाबाधित आढळून आले.  

१८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्तांचा आकडा ९९ हजार ८३३ वर पोहोचला आहे. तर बाधितांचा आकडा १ लाख ६ हजार ४४७ वर पोहचला आहे. शहरात ५८ तर ग्रामीण भागात कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष असे की, कोरोनाचे मृत्यूसत्र सुरू झाल्यानंतर प्रथमच नागपुरातील १३ तालुक्यांमध्ये एकही मृत्यू झाला नाही. मात्र दिवाळीच्या मोसमात चाचण्यांचा वेग मंदावला आहे.  

अधिक वाचा - छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने झाली व्यवसायाला सुरुवात

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र आताही मेयो, एम्स आणि इतर रुग्णालयांच्या तुलनेत मेडिकलमध्ये कोरोनाचे आताही सर्वाधिक रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर खाली आला आहे, रविवारी नागपुर ग्रामीण भागात कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही. त्यात तेरा तालुक्यातील ५८ जणांनी कोरोनावर मात केली. तर शहरातील विविध वस्त्यांमधील सुमारे १३० जणांना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. 

कोरोनामुक्तांचा आकडा ९९ हजार ८३३ वर पोहचला आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या १६८० चाचण्या झाल्या आहेत. यातील सर्वाधिक चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या आहेत. खासगी प्रयोगशाळेत ९६९ चाचण्या झाल्या असून यातील ४९जणांना कोरोनाची लागण असल्याचे आढळून आले. एम्स, माफसू आणि विद्यापाठातील प्रयोगाशाळेत नमुने तपासण्यात आले नाही. तर मेडिकलमध्ये ७ नमुने तपासले. यातील २ जण बाधित असल्याचा अहवाल पुढे आला. तर मेयोत २४७ नमूने तपासले यातील १४जणांना बाधा झाली असल्याचे पुढे आले. 

गृह विलगीकरणात २ हजार १८० रुग्‍ण आहेत. तर मेयो, मेडिकल, एम्ससह विविध रुग्णालयात ९१६ रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील ६३० रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागातील ३८६ रुग्ण आहेत. 

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे
   
१३ तालुक्यात २२ कोरोनाबाधित

नागपुरातील १३ तालुक्यांमध्ये २२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात नागपुर ग्रामीणमध्ये ७ , कामठीत ३, पारशिवणी, उमरेड, भिवापूर आणि रामटेक तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. तर नरखेड आणि हिंगणा तालुक्यात प्रत्येकी दोन आणि काटोल, कामठी तालुक्यात प्रत्येकी ३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर विविध रुग्णालयात अवघे ३८६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.मागील आठ महिन्यात नागपुरातील ग्रामीण भागात सुमारे २१ हजार ८६२ कोरोनाबाधित आढळले असून यातील ६३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ