रेल्वे तिकिटांचा मोठा काळाबाजार उघड; नागपूरच्या सीताबर्डीतील दलालांना रेल्वे पोलिसांकडून अटक 

योगेश बरवड 
Saturday, 21 November 2020

राहुल अशोक साठवणे (३७) रा. राधाकृष्णनगर, वाठोडा असे आरोपीचे नाव आहे. त्याचे सीताबर्डी मेनरोडवर ओम श्री साई टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स नावाने प्रतिष्ठान आहे. तो ऑनलाईन रेल्वे तिकीट चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर छापा टाकण्यात आला. त्यावेळी राहुल कार्यालयातच होता. 

नागपूर ः रेल्वे सुरक्षा दलाने सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी माता मंदिराजवळील ओम श्री साई टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापा टाकून रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. तिकीट दलालाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहुल अशोक साठवणे (३७) रा. राधाकृष्णनगर, वाठोडा असे आरोपीचे नाव आहे. त्याचे सीताबर्डी मेनरोडवर ओम श्री साई टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स नावाने प्रतिष्ठान आहे. तो ऑनलाईन रेल्वे तिकीट चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर छापा टाकण्यात आला. त्यावेळी राहुल कार्यालयातच होता. 

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

आरक्षित तिकिटांच्या विक्रीबाबत विचारणा केली असता त्याने आयआरसीटीसीचा अधिकृत परवाना असल्याचे सांगितले. संगणकाची तपासणी केली असता त्याने एकाच वेळी १२ हजार २७९ रुपये किमतीची सात तिकिटे आरक्षित केल्याचे निष्पन्न झाले. तिकिटांची संख्या परवानगीपेक्षा अधिक असल्याने सखोल चौकशी करण्यात आली. 

त्यात फेक आयडीच्या वापराने प्रवाशांच्या मागणीनुसार चढ्या दराने विक्री करीत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून संगणक, प्रिंटर, मोबाईल, आयआरसीटीसीचे डोंगल असा एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जाणून घ्या -थरारक घटनाक्रम : मध्यरात्री घरात शिरले दरोडेखोर; बापलेकावर हल्ला केल्यानंतर शस्‍त्र टाकून काढला पळ

वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये उपनिरीक्षक एच. एल. मीना, जवान अश्विन पवार, अमित बारापात्रे, अश्विनी मुलतकर यांचा समावेश होता. 

संपादन - अथर्व महांकाळ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people who selling black railway ticket caught by police in Nagpur