Petrol price : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत १० रुपयांचा फरक; जाणून घ्या आजचा भाव

राजेश रामपूरकर
Wednesday, 27 January 2021

आजच्या ताज्या आकड्यानुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सध्या ब्रेंट ऑईलची किंमत ५४ डॉलर प्रति बॅरल आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्यांनी नोकरदारांचे पगार अद्यापही पूर्ववत झालेले नसताना सतत भाव वाढ होत आहे.

नागपूर : महागाईमुळे अनेकांचे बजेट बिघडलेले असताना पेट्रोलने ९३ रुपयांचा तर डिझेलने ८३ रुपयांचा आकडा पार केला आहे. सतत भाव वाढ होत असल्याने हेच का ‘अच्छे दिन’ असे ग्राहकांकडून विचारणा होऊ लागली आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे ग्राहक आणि मालवाहतूकदारांच्या खिशाला झळ बसत आहे. इंधन दरवाढीवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींच्या वाढत्या किमतींमुळे आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

आजच्या ताज्या आकड्यानुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सध्या ब्रेंट ऑईलची किंमत ५४ डॉलर प्रति बॅरल आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्यांनी नोकरदारांचे पगार अद्यापही पूर्ववत झालेले नसताना सतत भाव वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांचे बजेट बिघडलेले आहेत.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

यामुळे गृहिणींचे घरातील बजेट बिघडले आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव आज २३ पैशांनी आणि डिझेलचे दर २४ पैशांनी वाढले आहे. लवकरच शंभरी पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol in Nagpur costs Rs 93 per liter