बंटी और बबली नंतर आता पिंकीही...

LADY-CHOR.jpg
LADY-CHOR.jpg

नागपूर : दागिने लांबविण्यात सराईत असलेल्या पिंकीला बेड्या ठोकण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत 13 चोरीच्या घटनांची तिने कबुली दिली असून, तिच्याकडून सोन्याचे अर्धा किलोपेक्षा जास्त दागिने, दीड किलो चांदी, सव्वा लाख रुपये रोख असा एकूण 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंकी ऊर्फ पौर्णिमा कामडे (25, रा. पारशिवनी) असे अटकेतील चोरट्या युवतीचे नाव आहे. ती उच्चशिक्षित असून एमएडपर्यंतचे शिक्षण झाले आहे. उच्च दर्जाचे राहणीमान असून इंग्रजीतून संभाषण करते. चार वर्षांपासून ती चोऱ्या करायला लागली. गर्दीच्या ठिकाणी सावज हेरायचा आणि दागिने लंपास करायला तिने सुरवात केली. प्रारंभी तिने पर्समधून दागिने लांबविणे सुरू केले. लवकरच ती तरबेजही झाली. मोठे सावज शोधण्यासाठी तिने इतवारीतील सराफा बाजाराकडे मोर्चा वळविला. अलीकडे ती सराफा ओळीतच वावरत होती. झिंगाबाई टाकळी रहिवासी अमन इंगोले हा 11 जानेवारी रोजी आपल्या आईला घेऊन सोन्याची चेन आणि लॉकेट खरेदीसाठी गेला होता. सोनसाखळी आपल्या आईच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवून दिली. मार्केटमध्ये अन्य सामानांची खरेदी करीत असताना पर्स चोरीला गेली. या प्रकरणी अमनच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पिंकीभोवती संशयाचा फेरा गडद होत गेला. सराफा ओळीतूनच तिला ताब्यात घेण्यात आले.

गावी जाऊन तिच्या घराची झाडाझडती घेतली असता, 17 लाख 80 हजार रुपये किमतीचे 609.45 ग्रॅम सोन्याचे दागिने, 62 हजार 500 रुपये किमतीचे 1 किलो 421 ग्रॅम चांदीचे दागिने, 12 हातघड्याळ, 1.12 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल आणि 1 लाख 28 हजार रुपये रोख असा एकूण 21 लाखांचा मुद्देमाल आढळून आला. तिने तहसील हद्दीत 7, सीताबर्डीत 5, रामटेक ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली.

संधी मिळताच दागिन्यांवर हात साफ
कपडे आणि बोलणे उच्चभ्रूपद्धतीचे असल्याने पिंकीवर कुणीही शंका घेत नव्हते. सराफा दुकानातून खरेदी करून बाहेर पडणाऱ्यांकडे तिचे लक्ष असायचे. संधी मिळताच ती दागिन्यांवर हात साफ करायची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com