कुख्यात आरोपीची बायको बनली गँगलिडर, चोरीच्या घटनेत दोघांना अटक

अनिल कांबळे
Sunday, 29 November 2020

तिने पतीच्या पंटरच्या मदतीने जवळपास १८ ठिकाणी चोरी केली. त्यांनी १० घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच रेल्वेतही चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई डीसीपी मतानी यांच्या मार्गदर्शनात पीआय जयेश भांडारकर, पीएसआय स्वप्नील वाघ यांच्या पथकाने केली.  

नागपूर : एका हत्याकांडात नवरा कारागृहात गेल्यानंतर त्याच्या बायकोने त्याच्या टोळीच कमान हाती घेतली. अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चोरी करणे आणि चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले. तहसील पोलिसांनी सापळा रचून महिला लिडरसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. प्राची सतीश गौर (वय २३, रा.नवीननगर, पारडी) आणि अजय खापेकर (तीन खंबा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - 'आधी सोयाबीन सडला, कापूसही करपला; आता तुरीवरही अळ्यांचा प्रादुर्भाव, सांगा आम्ही...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सिराज अन्सारी (सैफीनगर) हे उत्तरप्रदेशातील नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्या घरी २५ नोव्हेंबरला चोरी झाली. तहसील पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. एका अल्पवयीन चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने अन्य एका टोळीचा सदस्य असल्याची माहिती दिली. प्राची गौर हिचे नाव समोर आले. प्राचीचा नवरा सतीश गौर याने मस्कासाथमध्ये मर्डर केला होता. तेव्हापासून प्राची पतीची गँग सांभाळत होती. तिने पतीच्या पंटरच्या मदतीने जवळपास १८ ठिकाणी चोरी केली. त्यांनी १० घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच रेल्वेतही चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई डीसीपी मतानी यांच्या मार्गदर्शनात पीआय जयेश भांडारकर, पीएसआय स्वप्नील वाघ यांच्या पथकाने केली.  

हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०...

अन्य आरोपींचा शोध सुरू -
ताब्यातील आरोपींकडून चोरीचे वाहन, सिलेंडर, सोन्यांच्या दागिऩ्यासह ११ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्या टोळीत आणखी काही युवक असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्या आरोपींचा शोध सुरू आहे. पंटर चोरी किंवा घरफोडी केल्यानंतर चोरीचा माल प्राची गौरच्या घरी ठेवत होते. ती गँग लिडर असल्यामुळे ती घरफोडी करण्यासाठी मार्गदर्शन करीत होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested two accused in theft case in nagpur