'आधी सोयाबीन सडला, कापूसही करपला; आता तुरीवरही अळ्यांचा प्रादुर्भाव, सांगा आम्ही जगायचं कसं?'

बबलू जाधव
Sunday, 29 November 2020

हवामान विभागाने तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असून, शेतकऱ्यांवर संकटांमागून संकटे ओढवू लागली आहेत.

आर्णी  ( जि. यवतमाळ ) : शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक संकट येतच आहे. आधी हातातील सोयाबीन पीक गेले, तर कपाशीवरही गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. हजारो एकारातील पीक वाया गेले. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे तूर पीकही संकटात आले आहे. तुरीवर अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - बाप रे! गेल्या सहा महिन्यात तब्बल ९० एचआयव्ही रुग्ण;...

हवामान विभागाने तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असून, शेतकऱ्यांवर संकटांमागून संकटे ओढवू लागली आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे उत्पादनच न झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. ढगाळ वातावरणाने तूर पिकाचा फुलोरा जळून गळत आहे. तूरपिकांना लागलेल्या कोवळ्या तुरीच्या शेंगांमध्ये अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत असल्याने शेतामधील तूरपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - विटभट्टीसाठी वीजचोरी करणे बेतले मजुरांच्या जीवावर; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व धुक्यामुळे तूरपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरडवाहू तुरीचे पिके वाळत आहेत. पहिले सोयाबीननंतर कापूस व आता तूर पीकही हातून गेले आहे.
- बाळासाहेब निलावार, कृषितज्ज्ञ व प्रगतिशील शेतकरी, आर्णी.

हेही वाचा - कारंजात जणू काही तासभर होता यमराजांचा मुक्काम; एकाच तासात तब्बल तीन अपघातात तिघांचा मृत्यू

ढगाळ वातावरणामुळे तूरपिकाचे फुले गळून पडत आहेत. तुरीच्या शेंगांत प्रमाणापेक्षाही जास्त अळ्या निर्माण झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
-विजय डवले, शेतकरी, आर्णी.

हेही वाचा - काय सांगता! इथे चक्क बदकं देताहेत अनेकांना रोजगार; राज्यातील एकमेव पैदास केंद्र

शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकट येतच आहे. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक वाया गेल्याने सर्वाधिक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे आता शेतासाठी लागलेला खर्च व त्यासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे अशी चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.
- धनंजय जाधव, शेतकरी, आर्णी (जि. यवतमाळ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: insects attack on toor crop in arni of yavatmal