मित्र मित्राच्या मदतीने सतत करायचा असं, नेहमीच्या कटकटीला कंटाळून केले हे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

आईने बाहेरून अनेकदा हाक दिली; पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी बाहेरून जाऊन खिडकीतून बघितले असता त्रिशाने सीलिंग फॅनला ओढणीने बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. त्या जोरात किंचाळल्या. वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून त्रिशाला खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेले.

नागपूर : वाडी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्रिशा पाटील (16, रा. सिद्धार्थ सोसायटी, दवलामेटी, वाडी) असे मृत विद्यार्थिनीचे तर रोहित पारधी (20) असे आरोपीचे नाव आहे. 

आयुध निर्माणी अंबाझरी येथील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली त्रिशा 16 फेब्रुवारीला दुपारी शिकवणी वर्गाला गेली होती. सायंकाळी 5.30 वाजता ती घरी परतली आणि आपल्या खोलीत निघून गेली. रात्री वडील सुमंत पाटील घरी परतले. त्यानंतर जेवणाची तयारी करण्यात आली. आई तिला जेवणासाठी बोलवायला गेली. त्या वेळी दार आतून बंद होते. 

क्लिक करा - हे लेकाचे बामनं आम्हाला अक्कल शिकवतील काय?

आईने बाहेरून अनेकदा हाक दिली; पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी बाहेरून जाऊन खिडकीतून बघितले असता त्रिशाने सीलिंग फॅनला ओढणीने बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. त्या जोरात किंचाळल्या. वडिलांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून त्रिशाला खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्‍टरांनी तपासताच मृत घोषित केले. त्रिशाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात सर्वांची क्षमा मागितली होती. 

तपासात प्रकार उघड

वाडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता त्रिशाची रोहितसोबत मैत्री असल्याची बाब समोर आली. सोबतच त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्रिशाला मारहाण करीत अपमानित केल्याची आणि सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची बाब समोर आली. रोहितच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे पुढे येताच वाडी पोलिसांनी रोहितविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police files crime against friends in Nagpur

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: