रक्षक झाला राक्षस; विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पोलिस निरीक्षक करायचा बलात्कार

Police inspector tortures woman Nagpur crime news
Police inspector tortures woman Nagpur crime news

नागपूर : पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर एकटी राहणाऱ्या विधवा महिलेला वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला आणि चार लाखांनी लुबाडले. गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रिया हिचे १९९८ ला शिक्षक असलेल्या संतोष खारडे यांच्याशी झाले. त्यांना मुलगा असून तो पुण्यात शिकतो. २०१० साली पती संतोष यांचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून ती मुलाला घेऊन सासरकडे राहत होती. एकाकी जीवन जगत असलेल्या रियाला फेसबुकवर नागपूर पोलिसात पोलिस निरीक्षक असलेल्या अरविंद भोळे याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. भोळेने तिच्याशी चॅटिंग करीत सर्व माहिती घेत तिला जाळ्यात ओढले.

ओळख झाल्यानंतर त्यांनी आपआपले मोबाईल क्रमांक ऐकमेकांना दिले. मोबाईलवर ते तासनतास बोलत असत. भोळे याने ‘माझी पत्नी नेहमीच आजारी असते. त्यामुळे मला दुसरे लग्न करायचे आहे’ असे बोलून महिलेला विश्वासात घेतले. ८ नोव्हेंबर २०२० ला कौंडण्यापूर (जि. वर्धा) येथील एका मंदिरात लग्न केले. त्यावेळी भोळे हा नंदनवन येथील फ्लॅटमध्ये राहत होता. लग्नानंतर महिलेला घेऊन पोलिस उपनिरीक्षक काळुसे यांचा फ्रेण्ड्स कॉलनी येथील फ्लॅट भाड्याने घेतला.

महिलेचे काढले अश्‍लील फोटो

पीआय भोळे याने पत्नी रियासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. दरम्यान, पहिल्या पत्नीच्या उपचारासाठी भोळेने महिलेकडून एक लाख रुपये उकळले. रियाच्या तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या परस्पर विकल्या. भोळे याचा रियाच्या वडिलोपार्जित शेतीवर डोळा होता. ‘शेती माझ्या नावावर करून दे’, असे तो तिला म्हणत होता. महिलेने नकार देताच त्याने दारू पिऊन तिला मारहाण देखील करीत होता. १८ फेब्रुवारीला भोळे घरातून पैसे घेऊन पळून गेला.

पीआय भोळे निलंबित

महिलेला एकटी सोडल्यानंतर भोळे १५ दिवसांची आजारी रजा टाकून बाहेरगावी निघून गेला. दरम्यान रियाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत हकीकत सांगितली. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी भोळे याला तडकाफडकी निलंबित केले. भोळे याला अटक करण्यासाठी लवकरच पोलिसांचे एक पथक नाशिकला जाणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com