esakal | लाव्ह्यात भेसळयुक्त मिठाई, खवा जप्त; अवैध कारखान्यावर औषधी प्रशासनाची धाड
sakal

बोलून बातमी शोधा

police raid on Adulterated sweets in wadi Nagpur

या ठिकाणी नियम व निकषाला डावलून भेसळयुक्त खवा व मिठाई तयार होत असल्याचे निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य सामुग्री आढळून आली. 

लाव्ह्यात भेसळयुक्त मिठाई, खवा जप्त; अवैध कारखान्यावर औषधी प्रशासनाची धाड

sakal_logo
By
विजय वानखेडे

वाडी (जि. नागपूर)  दिवाळीच्या सणाला मिठाईचे वाढती मागणी लक्षात घेता मिठाई निर्मात्यांतर्फे ग्राहकांच्या आरोग्याला धोका होईल, अशी भेसळयुक्त मिठाई निर्माण केली जात असल्याची माहिती उघडकीस एकच खळबळ उडाली. 

प्राप्त माहितीनुसार मिठाई तयार करण्यात येणारे साहित्य रसायन व भेसळ पद्धतीने मिठाई , खवा लपून बनवित असल्याची माहिती वाडी पोलिसांना कळली होती. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे नियोजन व निर्देशानुसार वाडी पोलिसांनी गुरुवारी (ता.१२) सकाळी सहाच्या दरम्यान लावा गावात नामदेव वानखेडे यांच्या घरी छापा घातला. या ठिकाणी नियम व निकषाला डावलून भेसळयुक्त खवा व मिठाई तयार होत असल्याचे निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य सामुग्री आढळून आली. 

सविस्तर वाचा - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

वाडी पोलिसांनी तातडीने ही गंभीर बाब अन्न व औषधी प्रशासनाला दिली.सूचना मिळताच एफ.डी.ए.चे अधिकारी ललित सोयाम,आनंद महाजन यांनी लावा घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून माहिती घेतली असता मागील १० दिवसांपासून हा कारखाना या ठिकाणी सुरू झाल्याचे कळले. 

अधिक माहितीनुसार मेघराज मेसोसिंग राजपुरोहित (वय ४२, मसनिया, ता.lfवरी, जोधपूर, राजस्थान) यांच्या मालकीचा हा मिठाई बनविण्याचा कारखाना असून लाव्हानिवासी नामदेव वानखेडे यांच्या घरी भाड्याने जागा घेऊन सुरू करण्यात आला आहे. खास बाब म्हणजे दिवसा शटर बंद ठेवून आतमध्ये उत्पादन सुरू राहायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना काय सुरु आहे, याची माहिती होऊ शकली नाही. दुधाशी संबंधित पदार्थ निर्मितीचा कारखाना आहे, 

एवढीच मोघम माहिती नागरिकांना होती. उपस्थित एफ.डी.एच्या या अधिकाऱ्यांनी साहित्याचा पंचनामा करून व तपासणी नमुने संकलित केले. येथील सर्व साहित्य ताब्यात घेऊन घटनास्थळी उपस्थित आरोपी मेघराज मेसोसिंग राजपुरोहित व त्यांचे सहकारी यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक जायभाये यांच्या नेतृत्वात वाडी पोलिसांनीदेखील दखल घेऊन स्वतंत्र तपास सुरू केला आहे. पथकाने अंदाजे १लाख ६० हजार रुपयांचे खाद्य व यंत्रसामुग्री जप्त केल्याचे सांगितले. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

ग्रामपंचायतलाही नव्हता सुगावा 

या संदर्भात ग्रामपंचायतीलाही ही बाब माहित नसल्याचे माजी जि.प सदस्य सुजित नितनवरे, सरपंच जोत्सना नितनवरे यांनी पत्रकारांना सांगितली. कोणत्याही प्रकारची रीतसर सूचना व परवानगी घेण्यात आली नाही. ही भेसळयुक्त सामुग्री नागरिकांच्या आरोग्यास नुकसानदायक ठरू शकते. वाडीसह इतर ठिकाणी ही खाद्यसामुग्री विक्रीस जात असल्याने नागरिकांनी दिवाळी काळात सावधगिरी बाळगावी व लावा ग्रा.प हद्दीतील सर्व गोडाऊन व व्यावसायिकांनी ग्रा.प ला त्वरित आपले उत्पादन, वस्तू संग्रहण याची माहिती देऊन ना हरकत घ्यावे, अन्यथा ग्रा.प. नियमानुसार कार्यवाही करेल, असे आवाहन व इशारा ग्रा.पं.च्यावतीने देण्यात आला. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी योग्य तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ