esakal | वेश्‍यावस्ती गंगाजमुनावर छापा; दलाल सचिन उचिया फरार; एसएसबीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police raid on red light area in Nagpur

गंगाजमुनातील कुख्यात दलाल सचिन उचियासह अन्य दलालांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या आठवड्यातच ‘सकाळ’ने गंगाजमुनातील अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करण्यात येत असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

वेश्‍यावस्ती गंगाजमुनावर छापा; दलाल सचिन उचिया फरार; एसएसबीची कारवाई

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः गंगाजमुनातील अल्पवयीन मुलींसह वारांगणांना ड्रग्सचा हायडोज देऊन त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेण्यात येत होता. त्यामुळे एसएसबीने गंगाजमुनात छापा घातला. या छाप्यात परप्रांतातील १४ वारांगणांना ताब्यात घेण्यात आले. 

गंगाजमुनातील कुख्यात दलाल सचिन उचियासह अन्य दलालांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या आठवड्यातच ‘सकाळ’ने गंगाजमुनातील अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करण्यात येत असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाने बुधवारी दुपारी गंगाजमुनात छापा घातला. या छाप्यात परराज्यातील १४ वारांगणांना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे मेडीकल केल्यानंतर करूणा सुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

कश्‍मीरी गल्लीत जवळपास ५० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींकडून बळजबरी देहव्यापार करून घेत असल्याची चर्चा असलेला कुख्यात दलाल सचिन उचिया, बाबू निजू धनावत (रा. ढोलपूर, राजस्थान) आणि बिमलाबाई (कश्‍मीरी गल्ली) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

सविस्तर वाचा - अर्ध्यारात्री बोलावले तरी यावेच लागेल!, श्रीमुखात लगावली

बाबू धनावत याला अटक करण्यात आली. तर सचिन उचीया आणि बिमलाबाई फरार झाल्या. दोघांचाही पोलिस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनोज, इंगा, अमोल, ठाकूर, मोंटू, गजू, रोहित आणि मार्कंडे ही सर्व टोळी गंगाजमुनात वारांगणांना ड्रग्स पोहचवित असल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ