हुश्श... महावितरणला दिलासा;  वीजग्राहकांकडून तब्बल एवढ्या कोटींचा भरणा 

योगेश बरवड
Tuesday, 15 September 2020

लॉकडाउन सुरू झाल्यापासून वीजबिलाचा भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीजबिल भरले होते.

नागपूर : लॉकडाउनच्या काळात वीजबिल भरणे टाळणाऱ्या वीजग्राहकांनी अनलॉकदरम्यान बिल भरणे सुरू केले आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटींचा भरणा केला आहे. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महावितरणला मोठा दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाउन सुरू झाल्यापासून वीजबिलाचा भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडळांचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीजबिल भरले होते.

बापरे हे काय... गॅंगस्टर बनण्यासाठी केला गोळीबार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

मे महिन्यात ही टक्केवारी ३१ टक्क्यांपर्यंत घसरली आणि जून महिन्यात तर ती २५ टक्क्यापर्यंत खाली आली होती. यामुळे महावितरणला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. बिल भरणा वाढण्यासाठी सवलत देण्यासह महावितरणला मोठी उठाठेव करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून बिल भरणा वाढला. 
वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

ऑगस्ट महिन्यातील परिमंडळनिहाय भरणा 

  • परिमंडळ                भरणा करणारे ग्राहक                    भरणा केलेली रक्कम 

  • नागपूर                      १६ लाख                                   २४३ कोटी 

  • चंद्रपूर                        ७ लाख                                     ७५ कोटी 

  • गोंदिया                       ५ लाख                                     ५३ कोटी 

  • अमरावती                  १२ लाख                                     ८६ कोटी 

  • अकोला                     ११ लाख                                     ६७ कोटी 

 

ऑनलाइन पर्याय 

वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइट, महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्याची व ते भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल ॲप इंग्रजी व मराठी भाषेत आहे. एकाच खात्यातून अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅालेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाइट व ॲपवर उपलब्ध आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power consumer paid 524 crore to MSEDCL