esakal | 'रेमडिसिव्हिर'चा काळाबाजार, खासगी रुग्णालयाने एका इंजेक्शनसाठी मागितले २० हजार

बोलून बातमी शोधा

private hospital demand 20 thousand for one remdesivir injection in nagpur

रामदासपेठेतील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल रुग्णाला तातडीने रेमडिसिव्हिरची गरज होती. रुग्णालयाने प्रथम नातेवाईकाला ६ इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले. बाहेर रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन मिळाले नाही.

'रेमडिसिव्हिर'चा काळाबाजार, खासगी रुग्णालयाने एका इंजेक्शनसाठी मागितले २० हजार
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले. यामध्ये रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयाने अत्यवस्थ कोरोनाबाधिताच्या नातेवाईकाला रेमडिसिव्हिरसाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचा संतापजनक घटना घडली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावल्यामुळे रुग्णालयाने माफक दरात इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

रामदासपेठेतील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल रुग्णाला तातडीने रेमडिसिव्हिरची गरज होती. रुग्णालयाने प्रथम नातेवाईकाला ६ इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले. बाहेर रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन मिळाले नाही. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने 'आम्ही ब्लॅकमध्ये रेमडिसिव्हिर मिळवली असून तुम्हाला हवी असल्यास २० हजारात एक इंजेक्शन पडेल' असे सांगितले. सहा लसींसाठी १ लाख २० हजार रुपये आकारण्यात येणार होते. इतकी मोठी रक्कम आणायची कुठून? असा सवाल पुढे आला. रुग्णाच्या नाते नातेवाइकांनी सोहम फाउंडेशनचे संजय अवचट यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना शनिवारी रात्री ११ वाजता हा प्रकार सांगण्यात आला. ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. रुग्णालयाला दिलेल्या रेमडेसिव्हिरचा साठा बघितला. तेथील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. नातेवाईक रुग्णालयात परत येण्यापूर्वीच रुग्णाला इंजेक्शन देणे सुरू झाले होते.

हेही वाचा - वेकोलीकडून वीज केंद्राला अनियमित कोळसा पुरवठा, ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा होणार ठप्प?

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी त्यांच्या नातेवाइकांची ससेहोलपट होत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तक्रारीची दखल घेतली. यामुळे रुग्णाला इंजेक्शन मिळाले. खासगी रुग्णालयांनी रेमडिसिव्हिरचा उपलब्ध साठा दर्शनी भागात लावण्यात यावा. प्रशासनाने रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
-संजय अवचट, सोहम फाउंडेशन, नागपूर.