आता मानवी मुत्राचा करता येणार असाही उपयोग... वाचा ही संशोधनाची गाथा

मंगेश गोमासे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नागपूर : मानवी मूत्रापासून युरिया निर्मिती करण्याचा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना (खुर्द) येथील संशोधक विद्यार्थ्याने उभारला आहे. महेश चांडक या युवकाने साकारलेल्या प्रकल्पातील या खताचा शेतात वापर सुरू असून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. 

नागपूर : मानवी मूत्रापासून युरिया निर्मिती करण्याचा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना (खुर्द) येथील संशोधक विद्यार्थ्याने उभारला आहे. महेश चांडक या युवकाने साकारलेल्या प्रकल्पातील या खताचा शेतात वापर सुरू असून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. 

युवकांनी संशोधक व्हावे व उद्योजकतेवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने करीत असतात. "युरीन'चा वापर करून "युरिया' तयार करण्याची भन्नाट कल्पना त्यांनी अनेकदा मांडली. त्यांच्या या कल्पनेला "एमबीए'च्या विद्यार्थ्याने मूर्तरूप दिले असून, शेंदूरजना (खुर्द) येथे स्वत:च्या शेतीत त्याने "युरीन टू युरिया' प्रकल्प उभारला आहे. 

जवळपास 2015 पासून या प्रकल्पाच्या माध्यमातून महेश ऑर्गेनिक शेती करीत आहे. दहा हजार चौरस फूट जागेत हा प्रकल्प उभारून त्याने केवळ स्वत:च्याच नव्हे तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा करून देण्याचे काम केले आहे. दररोज गावाकडून शहराकडे रेल्वेने येत असताना महेशला स्टेशनच्या बाहेरील भिंतीवर नागरिक लघुशंका करण्याचा प्रकार नजरेस पडत होते. अनेकदा त्याबाबत नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, गाव छोटे असल्याने त्याठिकाणी मुतारी बांधणे शक्‍य होणार नसल्याचे प्रशासनाकडून उत्तर मिळाले. मात्र, त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असे.

सविस्तर वाचा - चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात

यासंदर्भात महेशने केमिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या मित्राशी चर्चा केली. त्याच्या डोक्‍यातून एक वेगळीच कल्पना बाहेर पडली. युरीन संकलन करून त्याचा वापर युरिया तयार करण्याची ही भन्नाट कल्पना होती. यासाठी युरीन संकलित करण्यासाठी विशिष्ट प्रकारची टॅंक विकसित करून त्यात युरीन संकलनास सुरुवात केली. शेतीत दहा दहा खड्डे तयार करीत त्यात तणसाचा वापर करीत महिनाभर पुरून ठेवले. एका महिन्यानंतर या द्रावणाचे युरियात रूपांतर झाले. या युरियाचा वापर त्याने सर्वप्रथम स्वतःच्याच शेतीत करायला सुरुवात केली. 

त्याचा वापर शेतीमध्ये खतासारखा करण्यास सुरुवात केली. या युरियाच्या वापराने शेतीचे उत्पन्न वाढले. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही ते वापरण्यास सुरुवात केली. वीस लिटर युरीन संकलनातून 10 किलो युरियाची निर्मिती करीत असल्याचे महेशने सांगितले. आता या खताची विक्रीही करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात 50 किलो युरिया 250 रुपयापर्यंत मिळत असताना 30 किलोच्या बॅगसाठी 150 रुपये आकारण्यात येत असल्याचे त्याने सांगितले.

जाणून घ्या - अस्थिविसर्जन करून परतताना आठ जणांचा मृत्यू

टॅंकमध्ये सेंसर

महेशने तयार केलेल्या मूत्र संकलन टॅंकमध्ये विशिष्ट सेंसर लावले आहेत. त्यामुळे टॅंक 75 टक्के भरताच सेंसर ऍक्‍टीव्हेट होऊन मोबाईलवर मॅसेज येतो. त्यामुळे ती टॅंक उचलून शेतात आणली जाते. यासाठी नगर परिषदेने गाडीची सोय करून दिल्याचे महेशने सांगितले. 

चहापत्तीचाही वापर
शहरात विविध चहाच्या दुकानात चहा तयार केल्यानंतर त्यातील चहापत्ती फेकून देण्यात येते. मात्र, युरिया तयार करण्यासाठी युरीनसोबत चहापत्तीचा वापर केला जातो. त्यासाठी संकलित केलेली चहापत्ती धुऊन घेत त्यातील साखरेचा अंश काढला जातो. त्यानंतर ती वाळवून युरीनसोबत गड्ड्यात पुरली जाते. 
- महेश चांडक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production of urea from human urine