शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनसंपर्क कक्ष गेला तरी कुठे?

public relation office still not ready in nagpur government medical college
public relation office still not ready in nagpur government medical college

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडिकल)मध्ये येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य उपचार व सल्ला देण्यासाठी जनसंपर्क कक्ष सुरू करण्यात येणार होता. मात्र, हा प्रस्ताव काही दिवसांतच गुंडाळला गेला. त्यामुळे जनसंपर्क कक्ष हरवला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. 

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पुढाकार घेत हा कक्ष तयार करण्याची सूचना २०१९ मध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला दिली होती. मात्र, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत गंभीरता न बाळगल्याने हा प्रस्ताव बारगळला. सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय) तसेच वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात येणार होती. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण विदर्भातील इतर जिल्हे, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील असतात. अशावेळी त्यांना योग्य उपचार मिळावे, त्यांच्या नातेवाईकांची थांबविण्याची सोय नसते अशावेळी रुग्ण व नातेवाईक गोंधळून जातात. यातून मार्ग काढण्यासाठी सर्जरी कॅज्युअल्टि शेजारील महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या कक्षात दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत जनसंपर्क कक्ष सुरू ठेवण्यात येणार होता. कक्षात वरिष्ठ निवासी डॉक्‍टर, वैद्यकीय अधिकारी, एक सामाजिक वैद्यकीय अधीक्षक आणि एक सहाय्यक असे पथक तैनात ठेवण्यात येणार होते. 

किरकोळ उपचारही होणार होते - 
विशेष असे की, किरकोळ उपचारावर रुग्णाचे समाधान होणार असेल तर डॉक्‍टर लगेच तपासून त्याला औषधे देतील, ही योजनाही या जनसंपर्क कक्षाच्या माध्यमातून राबवण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे हा कक्ष बंद पडला असल्याची चर्चा येथे होती. रुग्णाच्या नातेवाइकांच्या तक्रारींचा खर्च वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात साचतो. अतिव्यस्ततेमुळे तक्रारींचा निपटारा होणे शक्‍य नसते. अशावेळी रुग्णांना खेटे घालावे लागतात. या जनसंपर्क कक्षामुळे रुग्णांचा गोंधळ उडणार नाही. तत्काळ माहिती मिळेल. उपचारही मिळतील. रुग्णहित लक्षात घेत जनसंपर्क कक्ष तयार करण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com