रानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली, अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

रानडुकरांनी हल्ला केल्याने त्याच्या 20 वर्षीय बहिणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. 

रामटेक (जि.नागपूर):  आजी-आजोबांसोबत शेतातील धान उचलत असताना रानडुकरांनी युवतीवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना रानडुकराने धडक दिल्याने 20 वर्षीय तरुणी विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. दिव्या सिद्धार्थ सांगोडे (रा. चारगाव) असे मृत युवतीचे नाव आहे. 

क्‍लिक करा : आदित्य ठाकरे विचारणार पंतप्रधान मोदींना हा प्रश्‍न 

जीव गमावला 
तालुक्‍यातील चारगाव ग्रामपंचायत खैरी बिजेवाडाअंतर्गत येते. मुख्य धंदा शेती असलेल्या गावातील गुलशन सिद्धार्थ सांगोडे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रानडुकरांनी हल्ला केल्याने त्याच्या 20 वर्षीय बहिणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. 

क्‍लिक करा: घरी कोणीही नसल्याने तो आला, दहा मिनीटे अंगणात चर्चा 

वनविभागाकडून बंदोबस्त नाही 
जंगलातील रानडुकरे दररोजच शेतकरी, शेतमजूर यांच्यावर हल्ला करतात. शेतात काम करताना जीव मुठीत घेऊनच काम करावे लागते. हे रानडुकरांचे कळप शेतातील उभी पिके फस्त करून टाकतात. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर करतातच, ते शेतात काम करणाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला करतात. आतापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून अनेकदा मागणी होते. मात्र वनविभागाकडून काही बंदोबस्त होत नाही आणि नुकसानभरपाईदेखील मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The raid attacked, the girl fled, fell into the well, and