चौकाचौकात दिवाळी. राम रंगी रंगणार उपराजधानी...

Ram temple bhumi pujan
Ram temple bhumi pujan

नागपूर : राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अयोध्येत सुरू असली तरी संपूर्ण देशातच भक्तीयम वातावरण तयार झाले आहे. भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यासाठी संत्रानगरी आणि नागपूरकर सज्ज झाले आहेत. भाजपकडून चौकाचौकात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील धर्मिक संस्था आणि श्रीराम भक्तांनीही आतषबाजी आणि प्रसाद वितरणाची जंगी तयारी केली आहे. त्यावरून बुधवारी उपराजधानी राम रंगी रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपची जय्यत तयारी 
भारतीय जनता पक्षातर्फे शहरव्यापी जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासूनच ३०० ठिकाणी रामधून वाजवून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा सुरू असतानाच शहरातील प्रमुख मंदिर व चौकांमध्ये भजन, कीर्तनासह आतषबाजी करण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि आमदार गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत बडकस चौकात महाआरती होईल.

सायंकाळी दिवे लावून दिवाळी साजरी केली जाईल. महापौर संदीप जोशी, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, क्रष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, संघटन मंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, भोजराज डुंबे, देवेंद्र दस्तूरे, विनोद कन्हेरे, किशोर पलांदुरकर, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव, उपमहापौर मनीषा कोठे, दयाशंकर तिवारी, वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वात संपूर्ण सोहळा होईल. 

पूर्व नागपुरात ५०० किला लाडूचे वितरण 
आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात पूर्व नागपुरात ५०० किलो लाडूचे वितरण करीत आनंद साजरा केला जाणार आहे. कार्यकर्ते वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन भाविकांना लाडू वाटतील. पूर्व नागपूर मंडळाचे अध्याक्ष संजच अवचट यांच्यासह सर्व नगरसेवक, प्रभाग अध्याक्ष त्यांच्या क्षेत्रात सकाळपासूनच रामधून वाजविण्याची व्यावस्था करतील. सर्व प्रभागांमधील मंदिरांवर भगवा ध्वज लावण्यात येईल. राहुल जैन आणि पिंटू पटेल त्यासाठी परिश्रम घेत आहेत. लाडू तयार करण्याचे कार्य संपूर्ण सुरक्षात्मक उपाययोजनांसह सुरू आहे. 

सायंकाळी दिवाळी 
कोरोना संकटकाळातच भूमिपूजन सोहळा होत असला तरी राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. इच्छा असूनही अयोध्येला जाणे शक्या नसले तरी घरी राहूनच आनंद व्यक्त करण्याची तयारी भाविकांनी केली आहे. संत, महात्मे, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, धार्मिक संस्थांनी बुधवारी सायंकाळी घरासमोर दिवे लावून आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

पोद्दारेश्वर मंदिरात विशेष अनुष्ठान 
शहरातील रामभक्तांसाठी सर्वाधिक आस्थेचे ठिकाण असणारे पोद्दारेश्वर राम मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असले तरी मंदिरात विशेष अनुष्ठान होणार आहे. सकाळी ७.३० वाजता महारुद्राभिषेक , १० वाजता महामंत्राचा जाप, ४ वाजता सुंदरकांड, सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव साजरा होईल. सर्व कार्यक्रम फेसबूकवरून लाईव्ह होणार असून भाविकांना घरबसल्या त्याचा आनंद घेता येणार आहे. 

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com