केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल म्हणाले, ‘३ डी’चा वापर करून देश आत्मनिर्भर करा

Ramesh Pokhriyal says Make the country self-reliant using 3D
Ramesh Pokhriyal says Make the country self-reliant using 3D

नागपूर : अभियांत्रिकी क्षेत्र मोठे आहे. अभियंता देशनिर्माणाचे काम करतो. त्यामुळे आता अभियंत्यांनी लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या ‘थ्री डी’चा वापर करून देशाला आत्मनिर्भर करावे, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी केले.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या १८ व्या दीक्षान्त समारंभाप्रसंगी ते बोलत होते. आभासी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, एल ॲण्ड टीच्या डिफेन्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीचे संचालक जे. डी. पाटील, संस्थेचे संचालक डॉ. पी. एम. पडोळे उपस्थित होते.

डॉ. रमेश पोखरीयाल म्हणाले, पदवी आणि पदक मिळवित विद्यार्थी जीवनाच्या उंचीवर जाण्यास मदत करते. मात्र, ते करीत असताना देशासाठी आम्ही काय करतो, याचा विचार करावा. अभियंत्यांनी देश उभा केला आहे. त्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे.

त्यांच्यात असलेले कौशल्याने देशात परिवर्तन होईल. त्याला संशोधनाची जोड द्या. तसेच संशोधनाचे पेटंट करुन घ्या. त्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता वाढेल. यातून देश ज्ञानाचे केंद्र होईल आणि त्यातून अर्थप्राप्ती होण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करावे असे आवाहन त्यांनी केले.

संजय धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी शिकलेल्या संकल्पना आणि कल्पना लागू करण्याची वेळ असल्याचे सांगितले. अलीकडच्या वर्षांत भारताच्या वेगवान बदलत्या चेहऱ्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांनी आपली मूल्ये अबाधित राखण्याचे त्यांनी आवाहन केले. जे. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जे देशाने आणि समाजाने दिले आहे ते देशाला परत देण्याचे आवाहन केले.

त्यासाठी प्रामाणिकपणा आणि समाज आणि देशासाठी असलेल्या जबाबदारीची जाणिव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. तत्पूर्वी, डॉ. पडोळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. यावेळी अब्दूल सत्तार माप्रा यास विश्वेश्वरैय्या पदक आणि चेतना श्रीवास्तव हिला सर्वाधिक पदकाने सन्मानित करण्यात आले. आभार कुलसचिव डॉ. एस.आर. साठे यांनी मानले.

  • पीएच.डी. - ६१
  • मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी - २६८  
  • मास्टर ऑफ सायन्स - ९४ 
  • बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी - ६४८ 
  • बॅचलर ऑफ आर्किटेक्चर - ६३ 
  • पदके - ४५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com