प्रेयसीला मागितली चाळीस हजारांची खंडणी; अश्‍लील क्लीप व्हायरल करण्याची धमकी

अनिल कांबळे
Sunday, 15 November 2020

सक्करदरा हद्दीत ते एकत्र राहतात. काही दिवस चांगले गेल्यानंतर दोघांमध्ये पैसांसाठी वाद सुरू झाला. माहेरून ४० हजार रुपये आणण्यासाठी तिला मारहाण करायचा व धमकवायचा. पण, ती दुर्लक्ष करायची.

नागपूर : लग्न न करता सोबत राहणाऱ्या प्रेयसीलाच प्रियकराने ४० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोबाईलने काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. राष्ट्रपाल धनराज सहारे (२७, रा. सक्करदरा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपाल हा ईलेक्ट्रीशयनचे काम करतो. त्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) हिच्यासोबत सूत जुळले. दोघांचेही प्रेमप्रकरण वाढल्यानंतर तिला तो नागपुरात घेऊन आला. लग्न न करताच ते दोघेही जून २०१९ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

सक्करदरा हद्दीत ते एकत्र राहतात. काही दिवस चांगले गेल्यानंतर दोघांमध्ये पैसांसाठी वाद सुरू झाला. माहेरून ४० हजार रुपये आणण्यासाठी तिला मारहाण करायचा व धमकवायचा. पण, ती दुर्लक्ष करायची. या दरम्यान राष्ट्रपालने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना अनेकदा मोबाईलने फोटो काढले. तर काही वेळा व्हीडिओ काढले.

पैशांसाठी तो नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तसेच तिच्यावर अत्याचार करायला लागला. वारंवार पैशाची मागणी करीत तिला त्रस्त करीत होता तसेच मारहाण करीत होता. त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रियाने सक्करदरा ठाणे गाठले. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A ransom of forty thousand was demanded from beloved