esakal | रेमिडिसिव्हिरबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश; डॉक्टरांशी चर्चा

बोलून बातमी शोधा

ravindra thakare said Give the necessary patients remedicivir

इंजेक्शनच्या वापरासंदर्भातील धोरण ठरवण्यात आले. आयएएमच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ.राजेश सावरबांधे, डॉ. समीर चौधरी तसेच विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. नंदू कोलवाडकर, डॉ. अनूप मरार उपस्थित होते.

रेमिडिसिव्हिरबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश; डॉक्टरांशी चर्चा
sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जिल्ह्यात रेमडिसिव्हिरचा तुटवडा आहे. यामुळे काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. रेमडिसिव्हिर वापराचे धोरण ठरवण्यात यावे. रुग्णांच्या तीव्र लक्षणांवरून दोन गटात कोरोनाबाधितांचे वर्गीकरण करून आवश्यक असलेल्यांनाच रेमडिसिव्हिर इंजेक्शन टोचण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले.

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मृत्यू दरातही वाढ झाली. यावर उपचार म्हणून रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या मागणी प्रचंड वाढली. या इंजेक्शनसाठी औषधाच्या दुकानासमोर रांगा लागल्या आहेत. काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन तसचे इतर खासगी डॉक्टरांसोबत बैठक घेतली.

जाणून घ्या - मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या

या इंजेक्शनच्या वापरासंदर्भातील धोरण ठरवण्यात आले. आयएएमच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ.राजेश सावरबांधे, डॉ. समीर चौधरी तसेच विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. नंदू कोलवाडकर, डॉ. अनूप मरार उपस्थित होते. रेमडिसीव्हर इंजेक्शनचा वापर फक्त ‘ई’ व ‘एफ’ या दोन संवर्गात मोडणाऱ्या रुग्णांनाच देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

शासकीय डॉक्टरांची अनुपस्थिती

कोरोनाबाधितांवर मोठ्या प्रमाणात मेयो आणि मेडिकलमधील डॉक्टर सेवा देत आहेत. मात्र जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत मेयो, मेडिकलमधील डॉक्टर उपस्थित नव्हते. कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्वाधिक भार मेयो आणि मेडिकलसह एम्स सांभाळत आहे. रात्री अपरात्री अनेक गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये रेफर करण्यात येते. अशा तक्रारी पुढे येत आहेत. असे असताना रेमडिसिवहिरच्या वापराबाबतचे धोरण ठरवताना शासकीय डॉक्टरांची येथे अऩुपस्थिती असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

‘इ’ व ‘एफ’ गट

कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणावरून दोन गटात बाधितांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘इ’ गटातील रुग्णांमध्ये श्वसन संस्था बंद पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेण्याची प्रक्रियेत एका मिनिटात २४ पेक्षा जास्त असणे, spo2 ची पातळी ९४ पेक्षा कमी असणे, pao2 ची पातळी ६० पेक्षा कमी असणे अशा रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.  ‘एफ’ गटातील रुग्णांमध्ये श्वसन संस्था बंद पडण्यासह अन्य अवयवसंस्था निकामी होणे या लक्षणांचा समावेश होतो.