वाचा कोणते आमदार म्हणाले. ऑनलाइन शिक्षणामुळे पसरतेय सामाजिक विषमतेसह विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

शाळांचा ऑनलाइन शिक्षणासाठीचा हट्ट वाढत आहे. सुट्टीकाळात निवांत असणाऱ्या काही शाळाही आता ऑनलाइन शिक्षणाचा अट्टाहास धरला असून अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू करणे हे सर्वच शाळांना शक्‍य नाही. तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक बऱ्याच शाळांमध्ये त्या सुविधा नसून अनेक पालकांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यामुळे काही मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळत आहे, तर काहींना यापासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी ऑनलाइन शिक्षणाने समाजात शैक्षणिक विषमता निर्माण होत आहे.

नागपूर  : ऑनलाइन शिक्षण हे सर्वच शाळा आणि पालकांसाठी शक्‍य नाही. याउलट ऑनलाइन शिक्षणामुळे समाजात शैक्षणिक विषमता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होत असल्याने अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.

शाळांचा ऑनलाइन शिक्षणासाठीचा हट्ट वाढत आहे. सुट्टीकाळात निवांत असणाऱ्या काही शाळाही आता ऑनलाइन शिक्षणाचा अट्टाहास धरला असून अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू करणे हे सर्वच शाळांना शक्‍य नाही. तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक बऱ्याच शाळांमध्ये त्या सुविधा नसून अनेक पालकांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. यामुळे काही मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळत आहे, तर काहींना यापासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी ऑनलाइन शिक्षणाने समाजात शैक्षणिक विषमता निर्माण होत आहे.

Video : विशेष विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षिका ठरतेय आशेचा किरण, ऑनलाईन क्लासेस सुरू

अनेक पालकांवर मुलांचे शिक्षण बंद करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अशा सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या या शिक्षणाला हद्दपार करण्याची गरज आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण बंद करावे, अशी मागणी नागो गाणार यांनी केली आहे. यासह शासनाकडून ऑनलाइन धडे देण्याबाबत कुठलेही आदेश देत नसताना केवळ व्यावसायिक हेतूने ऑनलाईन शिक्षण देणाजया शाळांवर कारवाई करावी, अशी मागणीही गाणार यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read which MLA said. Depression among students with widespread social inequality due to online learning