पोर्टलच्या माध्यमातून `एसी‘ची दुरुस्ती

राजेश रामपूरकर
Wednesday, 28 October 2020

भारतीय ग्राहकांना घरबसल्या विश्वसनीय, खात्रीशीर व परवडेल अशी वातानुकूलित सेवा मिळावी यासाठी वेदांग प्रयत्नशील आहेत. वातानुकूलित युनिटची सेवा कोण देईल किंवा वातानुकूलित तंत्रज्ञ केव्हा येणार याबद्दल माहिती वेबसाइटवर नोंदणी झाल्यानंतर लगेच तुम्हाला मिळेल. कॉन्ट्रॅक्ट मधील अविश्वसनीयता, निराशा दूर करीत व ग्राहकांना संबंधित माहितीचा पुरवठा करीत सुरक्षितता प्रदान करण्यात येते. ९९९ सव्हिर्सेस डॉट कॉम ग्राहकांची ए. सी. बाबतच्या प्रत्येक प्रक्रियेतील प्रवासात मदत करण्यास सक्षम आहे.

नागपूर : टाळेबंदीमध्ये घरचा वातानुकूलित नादुरुस्त झाल्यास दुकाने बंद असल्याने कारागिराला बोलविणेही कठीण झाले होते. ती अडचण लक्षात घेऊन कोलकत्ता येथील २३ वर्षीय युवा वेदांग खेतावन यांनी अशा ग्राहकांना वाजवी दरात घरबसल्या एसी दुरुस्ती व जुन्या एसीची सव्हिसींग करून देण्यासाठी ९९९ सर्व्हिसेस डॉट कॉम हे पोर्टल सुरू केले. त्यामाध्यमातून ते आता देशभरातील अनेक शहरात एसी दुरुस्ती व देखभालीचे सेवा देत आहे. 

भारतीय ग्राहकांना घरबसल्या विश्वसनीय, खात्रीशीर व परवडेल अशी वातानुकूलित सेवा मिळावी यासाठी वेदांग प्रयत्नशील आहेत. वातानुकूलित युनिटची सेवा कोण देईल किंवा वातानुकूलित तंत्रज्ञ केव्हा येणार याबद्दल माहिती वेबसाइटवर नोंदणी झाल्यानंतर लगेच तुम्हाला मिळेल. कॉन्ट्रॅक्ट मधील अविश्वसनीयता, निराशा दूर करीत व ग्राहकांना संबंधित माहितीचा पुरवठा करीत सुरक्षितता प्रदान करण्यात येते. ९९९ सव्हिर्सेस डॉट कॉम ग्राहकांची ए. सी. बाबतच्या प्रत्येक प्रक्रियेतील प्रवासात मदत करण्यास सक्षम आहे. यामुळे अनावश्यक प्रदूषण व कचरानिर्मिती टाळली जात आहे.

अखेर सात महिन्यानंतर आपली बस सुरू, प्रवाशांना दिलासा 

जागतिक महामारीच्या काळात एप्रिल २०२० मध्ये या स्टार्टअपची निर्मिती झाली. आतापर्यंत त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक भागातील नामांकित लघुउद्योजकांशी वेदांगने नेटवर्क तयार केले आहे. 

शहरी, ग्रामीण भागासाठी उपयुक्त 

कोरोना महामारीने सूक्ष्म उद्योजक व विक्रेते यांच्याबद्दल सकारात्मक विचार करायला भाग पाडले. भारताला उत्तम वातानुकूलित सेवा पुरविणारे अनेक आहेत. मात्र, देशातील शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना वाजवी दरातील, विश्वसनीय व खात्रीशीर वातानुकूलित सुविधा देण्यासाठी हे स्टार्ट अप सुरू केलेले आहे, असे वेदांग म्हणतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repairing Work of AC Through Portal