याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड; विमान कंपन्यांची मनमानी वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

लॉकडाउन पूर्वी त्यांनी गो एअरच्या नागपूर-मुंबई प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,695 रुपयेप्रमाणे ग्रुप तिकीट खरेदी केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने जुलै महिन्यातील पूर्वनियोजित प्रवास टाळून सहा महिन्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कंपनीकडे विचारणा केली असता रिशेड्युलिंग चार्जेससह प्रतितिकीट 6,420 रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले. आधीच पैसे जमा असलेल्या प्रवाशांची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप हरिहर पांडे यांनी केला आहे.

नागपूर : लॉकडाउनचे निकष शिथिल झाल्यानंतर 25 मेपासून विमानसेवा सुरू झाली. मात्र, ज्यांनी यापूर्वीच आरक्षण करून ठेवले होते. अशा अनेकांना लॉकडाउनचा फटका बसला व आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. नागपूरचे हरिहर पांडे यांच्यासह 50 विमानप्रवाशांच्या वाट्याला कटू अनुभव आला आहे.

लॉकडाउन पूर्वी त्यांनी गो एअरच्या नागपूर-मुंबई प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,695 रुपयेप्रमाणे ग्रुप तिकीट खरेदी केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने जुलै महिन्यातील पूर्वनियोजित प्रवास टाळून सहा महिन्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात कंपनीकडे विचारणा केली असता रिशेड्युलिंग चार्जेससह प्रतितिकीट 6,420 रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले. आधीच पैसे जमा असलेल्या प्रवाशांची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप हरिहर पांडे यांनी केला आहे.

हरिहर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मार्च रोजी त्यांनी जुलै महिन्यातील 50 ग्रुप तिकिटे बुक करून ठेवली आहेत. त्याचे 2,695 रुपये प्रतिव्यक्ती प्रमाणे 50 तिकिटांचे 1 लाख 34,750 रुपये गो एअरकडे जमा केले. कोरोनाच्या संकटकाळात प्रवास अशक्‍य असल्याने तिकीट रद्द करून परतावा मिळावासाठी वारंवार विनंती केली. कंपनीने रक्कम परत करण्यास नकार दिला. प्रवाशांना त्याच किमतीत पुढे प्रवास करता येईल. कुठल्याही अतिरिक्त रकमेशिवाय तिकीट उपलब्ध करून देऊ, असे संकेतस्थळावर आहे. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांकडून अतिरिक्त रकमेची मागणी होत असल्याचे पांडे यांचे म्हणणे आहे.

अवश्य वाचा- नागपुरात विवाहासाठी आता फक्त २७ हजारांचे पॅकेज...खर्च कमी, सुरक्षेची हमी

प्रवाशांना त्वरित परतावा मिळवून द्या

त्यांनी 29 डिसेंबर 2020 साठी रिशेड्युलिंगसाठी विनंती केली असता, प्रतिप्रवासी 6 हजार 420 रुपये भाडे लागणार असल्याचे गणित त्यांच्यापुढे मांडण्यात आले. वास्तविक सहा महिन्यानंतरचे मुंबईचे तिकीट अडीच हजारात उपलब्ध होऊ शकते. पण, गो एअरकडे पूर्वीच पैसे जमा आहेत. याचाच गैरफायदा कंपनी घेत आहे. अशा आर्थिक लुबाडणुकीची दखल नागरी हवाई वाहतूक मंत्रालय महासंचालनालयाने घावी, तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना त्वरित परतावा मिळवून द्यावा, अशी मागणी हरिहर पांडे यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescheduling charges higher than airplane ticket fare