उमरेड तालुक्यातील निवडणुकीत कोण मारणार बाजी: ४७ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

अनिल पवार
Wednesday, 9 December 2020

तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारणसाठी १८, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ आणि अनुसूचित जाती ९, तर अनुसूचित जमातीसाठी ७ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 

उमरेड (जि. नागपूर) :   तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी दि. ८ डिसेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे आदेशान्वये उमरेड तहसील कार्यालयाच्या सभागृहात माननीय तहसीलदार प्रमोद कदम यांचे उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रदीप वरपे,त्रिलोकचंद लांजेवार,मदन जोगदंड यांनी आरक्षणाचे संपूर्ण नियोजन पार पाडले. आरक्षण हे सन २०२० ते २०२५ या कालावधी करिता असून सन १९९५ ते २०१५ या कालावधीच्या आरक्षण आढावा घेऊन आरक्षण काढण्यात आले.

तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारणसाठी १८, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ आणि अनुसूचित जाती ९, तर अनुसूचित जमातीसाठी ७ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 

हेही वाचा - "मेरा जमीर अब भी जिंदा है" असं म्हणत पोलिस...

तालुक्यातील ४७ पैकी १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी २०-२१ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदारयादी प्रसिद्ध करणे, सदस्यांचे वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले होते. राहिला तो सरपंच आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न आज निकाली काढण्यात आला आहे. उमरेड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडतीकडे कटाक्षाने लक्ष लागले होते. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उमरेड तहसील कार्यालयात तहसीलदार प्रमोद कदम यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले.

सरपंच पदाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 

मंगळवारी ८ डिसेंबर रोजी उमरेड येथील तहसील कार्यालयात सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रमास उमरेड तालुक्यातील सरपंच व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार  लांजेवार, नायब तहसीलदार प्रदीप वरपे,नायब तहसीलदार त्रिलोकचंद लांजेवार,मदन जोगदंड यांनी काम पाहिले. 

अनुसूचित जातीकरिता : बोरगाव(कलांदी), वेलसाखरा,गोधनी,), खुर्सापार उम

अनुसूचित जाती स्त्रीकरिता: सेव, कळमणा (उम), धुरखेडा, शिरपूर, ठोंबरा.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी  हळदगाव, ब्राम्हणी, हेवती, पिपरा, सावंगी बुज,बो रगाव लांबट, आपतूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीकरिता: परसोडी, हिवरा, सिंगोरी, किन्हाळा (सिस), सिर्सी, विरली

नक्की वाचा - ब्रेकअप झालं म्हणून भर रस्त्यात प्रेयसीवर केला चाकूहल्ला; नागरिकांनी केली प्रियकराची बेदम धुलाई

अनुसूचित जमातीकरिता : डव्हा, बोथली, खेरी चारगाव

अनुसूचित जमाती स्त्रीकरिता: चांपा, आंबोली, देवळी आमगाव, खुर्षापार बेला

सर्वसाधारणसाठी : पाचगाव, सायकी, वायगाव (घो) उदासा, गावसुत, बेला ,चनोडा, सादगी खुर्द, नवेगाव साधु

सर्वसाधारण स्त्री : शेडेश्वर,कळमणा (बेला), निरव्हा, सालईराणी, सुरगाव, मटकाझरी, उटी, मांगली, मकरधोकडा

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservations for Gram panchayat elections announced in Umred Nagpur