मुलासाठी नोकरी सोडली अन्‌ झाली...

rita Khirwadkar become a dress designer
rita Khirwadkar become a dress designer

नागपूर : सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यातल्या त्यात हाती घेतलेले काम जर आवडीचे असेल तर साकारल्या जाणाऱ्या वस्तूला विलोभनीय रूप मिळते. त्यामुळे केलेल्या कार्यातून स्वतःला समाधान तर मिळतेच; शिवाय आपण केलेल्या कार्याची दखल इतरांना घेणे भाग पडते. असाच एक आगळावेगळा प्रवास करीत आज एक यशस्वी ड्रेस डिझायनर म्हणून स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या रिता दीपांशू खिरवाडकर या महिलांना आपल्यातील प्रतिभा जपण्याचा सल्ला देतात. 

रिता यांचे शिक्षण एमबीए (मार्केटिंग ऍण्ड सिस्टिम) क्षेत्रात झाले. तब्बल दहा वर्षे त्यांनी या क्षेत्रात कार्य केले. 2007 मध्ये लग्नानंतर त्या एका नामवंत बॅंकेत चांगल्या पदावर नोकरीवर होत्या. मात्र, एका बाळाची आई झाल्यानंतर त्यांनी मुलाला पूर्ण वेळ देणे कर्तव्य समजले. आपण काही करू शकत नाही, ही सल त्यांच्या मनात होती. यामुळे त्यांनी घरी राहूनच ऑनलाइन प्रणालीने अनेक उद्योग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करूनही त्यांना समाधान मिळत नव्हते. स्वतःची आवड जोपासत ड्रेस डिझायनर म्हणून कार्य करण्याचे त्यांनी ठरवले आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव आहे. 2015 पासून त्यांनी "देविका बुटिक' नावाने स्वतःच्याच घरी बुटिक सुरू केले.

व्यवसाय सांभाळताना कुटुंबाकडेही त्यांचे लक्ष असते. स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आज पाच ते सात लोकांना रोजगार दिला. सर्व प्रकारच्या कापडांवर ग्राहकांच्या आवडीप्रमाणे त्या डिझाइन करतात. गेल्या चार वर्षांत एक हजाराच्या वर त्यांनी स्वतः ड्रेस डिझाइन केले. आपल्या आवडीचे, मनाला समाधान देणारे कार्य कुटुंबाला सांभाळत असताना जर का एवढ्या यशस्वीपणे करता येत असेल, तर यासारखा दुसरा आनंद कुठला असेल? असे रिता सांगतात. 

कर्तव्य न विसरता प्रतिभा जपा 
प्रत्येक महिलेत काही ना काही प्रतिभा असते. त्या प्रतिभेचा वापर योग्य ठिकाणी करून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासोबतच कुटुंबाची काळजी घेणे, हादेखील स्त्रियांसाठी प्राधान्याचा विषय आहे. तुम्ही जे उत्कृष्ट करू शकता त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. महिलांनी आपले कर्तव्य न विसरता आपले गुण, आपल्या प्रतिभा जपल्या पाहिजे. तेव्हा आयुष्यात सर्वच दृष्टिकोनातून पुढे जाणे सहज शक्‍य होते. 
- रिता खिरवाडकर, ड्रेस डिझायनर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com