घ्या आता... आतातरी घालाल ना मास्क, दंडामध्ये दुपटीहून अधिक वाढ

Rs 500 fine for not wearing mask : Home Minister Deshmukh
Rs 500 fine for not wearing mask : Home Minister Deshmukh

नागपूर  : कोरोना वॅक्सीन जोवर येत नाही, तोवर हा संसर्ग असाच सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे याचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, यानंतरही अनेक जण मास्क परिधान करीत नसल्याचे दिसून येते. मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून दंडातही ३०० रुपये वाढ करून ५०० रुपये करण्यात येत आहे. सोमवारपासून त्यावर अंमल होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारला दिली.

विभागीय आयुक्तालयात कोरोनासंदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर देशमुख प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र त्याला न जुमानता हजारो नागरिक शहरात विनामास्कने फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. 

परंतु यानंतरही अनेक जण मास्क परिधान करीत नसल्याचे दिसून येतात. विनंतीनंतरही नागरिक जुमानत नाहीत, त्यामुळे आता याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. ३७५ वर पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांना देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या उपचाराची कशी सोय करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांसोबतच प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी डेडिकेटेड बेड उपलब्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.   
 

कोरोना काळात उच्चशिक्षणमंत्र्यांचा दौरा

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ऑनलाइन पद्धत स्वीकारली आहे. यासंदर्भात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत सोमवारी (ता.14) पुर्व विदर्भातील तीन विद्यापीठांची आढावा बैठक घेणार आहेत. उदय सामंत सोमवारी सकाळी 11 वाजता नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय भवनात नागपूर विद्यापीठ तसेच कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडेच गोंडवाना विद्यापीठाचादेखील प्रभार आहे. परीक्षांचा आढावा असल्याने तेथे संबंधित अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित राहतील. याशिवाय विद्यापीठाचे इतर संवैधानिक पद असलेले अधिकारीदेखील उपस्थित राहतील.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com