आरटीई'ची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 24 जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू होणार होती. यासाठी शाळांना "आरटीई' संकेतस्थळाची लिंक देत, या माध्यमातून शाळा पालकांना संदेश पाठविण्यात येणार होते. याशिवाय शाळांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पालकांच्या संदेशामध्ये प्रवेशाची वेळ आणि तारीख दिली जाणार होती. मात्र, 24 जून उलटल्यावरही शाळांकडून संदेश न आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली.

नागपूर  : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असताना, जिल्ह्यात त्याबाबत हालचाली नसल्याचे चित्र होते. शुक्रवारी विभागाला प्रक्रिया राबविण्याबाबत महापालिकेने परवानगी दिल्यानंतर आता सोमवारपासून शाळांमध्ये कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केल्यावर तात्पूरता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत यंदाच्या सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना 17 मार्च रोजी संदेश पाठविण्यात आले होते. मात्र, टाळेबंदीमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही.

`त्यांच्या` नोकरीवर आहे टांगती तलवार...वाचा सविस्तर

सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 24 जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू होणार होती. यासाठी शाळांना "आरटीई' संकेतस्थळाची लिंक देत, या माध्यमातून शाळा पालकांना संदेश पाठविण्यात येणार होते. याशिवाय शाळांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पालकांच्या संदेशामध्ये प्रवेशाची वेळ आणि तारीख दिली जाणार होती. मात्र, 24 जून उलटल्यावरही शाळांकडून संदेश न आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली.

शुक्रवारी या बाबत महापालिका आयुक्तांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळांना पाठविले. आता सोमवारपासून पालकांना संदेश मिळणार आहे. त्यासाठी संबंधित पालकांना मूळ प्रमाणपत्रे व छांयाकित प्रतीच्या एका संचासह संबंधीत दिवशी शाळेवर उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. यानंतर ही कागदपत्रे, मुख्य पडताळणी समितीकडे जाणार आहे. समिती कागदपत्रे तपासून त्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात येणार आहे.

इन्फोबॉक्‍स
शहरातील जागा - 6,784
आलेले अर्ज - 31,044
निवड झालेले विद्यार्थी - 6,685

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE's admission process has finally started