विद्यापीठाचा 'आर्कियोलॉजी' घडविणार प्राचीन इतिहासाचे दर्शन, ऐतिहासिक पुरातत्वीय ठेवा सर्वांसाठी खुला

RTM nagpur university archaeology department organized exhibition of historical archaeology
RTM nagpur university archaeology department organized exhibition of historical archaeology

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग लवकरच प्राचीन इतिहासाचे दालन सर्वांसाठी खुले करणार आहे. गेल्या ६६ वर्षांतील उत्खनन व संशोधनात सापडलेल्या हा पुरातत्त्व ठेवा बघण्याची संधी महिनाभरात उपलब्ध होईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

विविध उत्खननात सापडलेल्या वस्तू, प्राचीन मूर्ती आणि नाणांच्या या खजिन्यात समावेश आहे. या सर्व प्राचीन आणि मौल्यवान वस्तूंची माहिती नव्या पिढीला व्हावी, त्यातून आपला इतिहास आणि संस्कृतीची समृद्धी परंपरा जिज्ञासू, विद्यार्थ्यांना व्हावी हा हेतू आहे. विद्यापीठात १९५५ साली प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग सुरू झाला. स्थापना ते आजवर या विभागाद्वारे विविध पुरातत्व ठिकाणी उत्खननाचे काम करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात प्राचीन जीवाश्म, मूर्ती, नाणे, पाषाणकालीन हत्यारे आणि मृदभांडी आदी पुरातत्वीय ठेवा सापडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विभागात यावर संशोधन आणि त्याचे जतन करण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने असलेला हा ठेवा विद्यार्थी आणि या विषयात रस घेणाऱ्यांना बघता येणे आवश्यक आहे. त्यातून विद्यापीठाचा नावलौकीक वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या विभागातील प्राचीन साहित्याचे प्रदर्शन करीत, त्यातून शैक्षणिक पर्यटन सुरू करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून संग्रहालय उभारण्याचे ठरविले. त्यासाठी निधीची तरतूद होऊन कामही सुरू झाले आहे. महिनाभरात हे संग्रहालय सुरू करण्यात येईल व त्यानंतर लवकरच ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी यांनी दिली. त्यांच्या देखरेखीखाली या संग्रहालयात प्रत्येक वस्तूंची व्यवस्थित आणि आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात येत आहे. 

'हे' असेल संग्रहालयात - 
विद्यापीठाद्वारे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागात तयार करण्यात येणाऱ्या संग्रहालयात यादवकालीन, राष्ट्रकुट, चालुक्य, कलचुरी आणि भोसलेकालीन मूर्ती, प्राचीन आणि मुगलकालीन नाणे, ताम्रपत्र, पाषाणयुगातील हत्यारे, धातूंच्या वस्तू, भारताच्या विविध कालखंडातील 'मृदभांडी'चा (मातीचे भांडे) समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने हडप्पा संस्कृती, डायमाबाद वेअर, मालवा, जोर्खे,महाभारतकालीन, चित्रदुसर भांडी, नालंदा कृष्ण ओपदार मृदभांडी, मॉडर्न पॉटरीचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय प्राचीन जीवाश्म, शहर व विदर्भातील विविध भात सापडलेल्या प्राचीन वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, त्याची आकर्षकरीत्या मांडणी करण्यात आलेली आहे. 

संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या प्राचीन वस्तूंचा संग्रह असल्याचे कळणार असून आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होईल. 
-डॉ. प्रीती त्रिवेदी, विभागप्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com