नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाचे जागतिक संशोधकांच्या यादीत नाव, अप्लाईड फिजिक्समध्ये ८१७ संशोधन पेपर

rtm nagpur university professor dr sanjay dhobale name in international scientist list
rtm nagpur university professor dr sanjay dhobale name in international scientist list

नागपूर : भौतिकशास्त्र (अप्लाईड फिजिक्स) या विषयात जागतिक संशोधकांच्या यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय जानराव ढोबळे यांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे.  

अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठातील डॉ. जॉन लोन्नडीस, डॉ. केवीन बॉयक आणि डॉ. जेरोन बास या तीन वैज्ञानिकांनी विश्वभरातील संशोधकांचा स्कोपस डाटा बेसवरून माहिती घेऊन त्यांच्या स्कोपसमधील साईटेशन, एच-इंडेक्स व प्रकाशित झालेली शोधनिबंधाची संख्या यावरून जगभरातील संशोधकांची माहिती एकूण १७६ उपविषयांमध्ये वेगळी केली. त्यानुसार प्रत्येक विषयात जगभरातील टॉप २ टक्के वैज्ञानिकांची यादी तयार केली आहे. डॉ. संजय ढोबळे यांनी एलईडी, रेडीऐशन डॉसीमेट्री मटेरियल, बॉयोसिंथेसीस, वॉटर प्युरिफिकेशन, फ्लाय अ‌ॅश व नॅनोमटेरियल यावर संशोधन कार्य केले. या विषयांमध्ये त्यांनी आतापर्यंत ८१७ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले. यात 'स्कोपस'मध्ये ६१७ शोधनिबंधांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या संशोधन कार्यात ६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यातून त्यांनी १० शोधकर्त्या विद्यार्थ्यांना परदेशात पोस्ट डॉक्टरेटसाठी संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी एकूण ३१ पेटंट प्रकाशित केले असून, त्यापैकी २ पेटंटला मान्यता मिळाली आहे. 

एल्सविअर, नोवा, सीआरसी यांसह आंतरराष्ट्रीय प्रकाशनाद्वारे १५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी १६ पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी संशोधन कार्यासाठी एकूण १२ देशात भेट दिली. तसेच इंडिया टॉप फॅकल्टी अवॉर्ड, विद्यापीठ उत्कृष्ट संशोधक अवॉर्ड, विदर्भ रत्न अवार्ड व डॉ. मेघनाथ साहा संशोधक अवार्डने सन्मानित करण्यात आले. जगभरातील टॉप वैज्ञानिकांमध्ये त्यांचे नाव आल्याने त्यांना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. नीरज खटी व इतर प्राध्यापकांनी डॉ. संजय ढोबळे यांचे अभिनंदन केले. ते आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय व सहाय्यक संशोधकांना देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com