साहिल सैयदने हडपला प्रेयसीचा फ्लॅट

sahil syeed
sahil syeed

नागपूर : वादग्रस्त साहिल खुर्शीद सैयद याने एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या नावे असलेला फ्लॅट हडपला. या प्रकरणी साहिलसह चौघांवर हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यामध्ये साहिलची खास मैत्रीण निलीमा जयस्वालचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा पावर हाऊस मागे शिला अपार्टमेंटमधीस ३०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणारी ३५ वर्षीय पिडीत महिला रिया (बदललेले नाव) २०१३ ला साहिलची ओळख झाली. साहिलने अविवाहित असल्याचे सांगून रियाशी मैत्री केली. तिला मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘तुझ्याशी लग्न करून तुला राणी बनवून ठेवेल' असे आमिष दाखवले. त्याच्या प्रेमात वेडी झालेली रिया त्याने सांगितल्याप्रमाणे वागत होती.

 साहिलने रीयाला फ्लॅट नावावर करून मागितला. मात्र रियाने त्यासाठी नकार दिला. साहिलने चिडून रियाला जबरजस्त मारहाण केली. फ्लॅट नावे न केल्यास अनैतिक संबंधावरून बदनामीची धमकी साहिलने रियाला दिली. ऑगस्ट २०१९ मध्ये साहिल, त्याची खास निलिमा जयस्वाल, भाऊ तौफीक सैयद, आणि जूबेर हे रियाच्या घरी आले. तिच्याशी बळजबरी केली. मारहाण केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कोऱ्या स्टॅंपपेपरवर सह्या घेतल्या. फ्लॅटचे दस्तावेज हिसकावून घेतले. अशाप्रकारे रियाची फसवणूक करीत तिचा फ्लॅट हडपला. हुडकेश्‍वर पोलिसांनी या प्रकरणी साहिलसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहे.


संपादन- अनिल यादव
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com