घराबाहेर निघणेही कठीण असताना त्यांनी केली ही सोय, समाजसेवेच्या नावावर सुरू केला हा धंदा...

Sale of liquor in water pouches in Nagpur
Sale of liquor in water pouches in Nagpur

नागपूर : सध्या देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडनेही कठीण झाले आहे. अत्यावश्‍यक काम असल्यास बाहेर निघण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक वस्तू सोडल्या तर सर्व प्रकारचे दुकाने बंद आहेत. यामुळे अनेकांचे व्यसन पूर्ण होत नाही. दारूतर सोडा साधा खर्रा मिळत नसल्याने करावे काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. अशात एकाने समाजसेवेचे कारण पुढे करून अवैध व्यवसाय चालवला. याची माहिती पोलिसांना मिळताच धक्‍काच बसला... 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात संचारबंदी असल्याने अनेक प्रतिष्ठांनांसह मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक दारुड्यांचे हाल होत आहे. पान, खर्रा, गुटखा पुडी, दारू आदी मिळत नसल्याने घरात काय करावा असा प्रश्‍न पडत आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांच्या दंडुक्‍याचा सामना करावा लागत आहे. यामुळे "इधर खाई उधर कुआं' अशीच स्तिथी व्यसन करणाऱ्यांची झाली आहे.

मात्र, कोरोना विषाणूच्या दहशतीतही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना चहा, नाश्‍ता पुरविण्याचे काम सामाजिक संस्था, नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बेघर व गरिबांनाही मदत करण्यात येत आहे. समाजसेवा करणारे रस्त्यांनी बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा किंवा पोलिसांचा सामना करावा लागत नाही आहे. हीच बाब हेरून एका महाशयाने अवैध व्यवसाय सुरू केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक पाण्याच्या पाऊचमध्ये मोहाची दारू भरून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होती. यानंतर कोण अशाप्रकारे दारूची विक्री करीत आहे याची माहिती पोलिसांनी काढली. त्यात जुना बगडगंज येथे संगीता बोरकर हिच्या घरी पाण्याच्या पाऊचमध्ये मोहाची दारू भरून विकण्यात येत असल्याची माहिती समजली. त्यावरून पोलिसांनी संगीताच्या घरी धाड घातली. 

यावेळी अब्दुल सद्दाम अब्दुल रशीद (31, रा. मोठा बाजबाग), मनीष सुधाकर दहीकर (28, रा. आदर्शनगर) व संगीता बोरकर (रा. जुना बगडगंज) हे मशीनद्वारे पाण्याच्या पाऊचमध्ये दारू भरताना दिसून आले. पोलिसांना विचारणा केली असता पाण्याचे पाऊच असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांना आधीच विश्‍वसनीय माहिती मिळाल्याने एक पाकीट फोडून पाहिले असता त्यात मोहाची दारू आढळून आली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून नमुद तिन्ही आरोपींना अटक केली.

समाजसेवेच्या नावावर गोरखधंदा

देशात संचारबंदी असल्यामुळे अनेक गरिबांच्या हातचा व्यवसाय गेला आहे. सर्व दुकाने बंद असल्यामुळे रोजगार मिळणेही कठीण झाले आहे. यामुळे जगण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती हेरून आरोपींनी गोरखधंदा सुरू केला होता. पोलिसांनी हे पाऊच कुठे विकता असा प्रश्‍न केला असता पाऊच आम्ही विकत नसून संचारबंदी काळात गरजू लोकांना मोफत वाटप करीत असल्याचे सांगितले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली नसती तर असा प्रकार सुरू असल्याचे उघकीस आले नसते. 

तिघांना केली अटक

संचारबंदीच्या काळातही पाणी पाऊचमध्ये मोहाची दारू विकत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून डबक्‍या मोहाची दारू, सीलबंद प्लॅस्टिक पाऊच, रिकामे पाऊच, सील करण्याची मशीन, रोख असा चार हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com