विजयी जल्लोष होतच सलील देशमुख मैदानात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेता सलील देशमुख यांनी मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कलमधून घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सोनखांबचे सरपंच प्रवीण अडकिने यांचा 4397 मतांनी पराभव केला. जिल्ह्यातून जास्त मताधिक्‍क्‍याने निवडून येणारे ते एकमेव उमेदवार ठरले आहेत.

काटोल (जि.नागपूर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विश्राम न करता आपल्या सर्कलमधील जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात जाऊन ते आभारसभेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क कायम ठेवत आहेत. 

क्‍लिक करा : नागपूर जिल्हा परिषद :  21 व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळयात? 

आभारसभेच्या माध्यमातून साधला जनतेशी संवाद 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेता सलील देशमुख यांनी मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कलमधून घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सोनखांबचे सरपंच प्रवीण अडकिने यांचा 4397 मतांनी पराभव केला. जिल्ह्यातून जास्त मताधिक्‍क्‍याने निवडून येणारे ते एकमेव उमेदवार ठरले आहेत. 
निकालानंतर सलील देशमुख हे दगदगीनंतर विश्राम करतील असे सर्वांना वाटले होते. परंतु, त्यांनी कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता दुसऱ्या दिवशीपासून सर्कलमधील गावांमध्ये दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. जनतेचे आभार मानून त्यांच्या काय अडचणी आहे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मोठ्या अपेक्षेने मला जनतेने निवडून दिले. त्या अपेक्षांवर मी पूर्ण ठरलो पाहिजे. विकासकामे होत असताना, पण ती दर्जेदार झाली पाहिजे, यावर माझा भर असल्याचेसुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. 

क्‍लिक करा : #zpelectionresults ः शिवसेना खल्लास, एकच उमेदवार विजयी 

आज त्यांनी रिधोरा पंचायत समितीमधील काटेपांजरा, दोडकी, वसतंनगर, घुबडी, मिनीवाडा, मसाळा, रिंगणाबोडी आदी गावांमध्ये भेटी देऊन जनतेचे आभार मानले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, कॉंग्रेसचे पदम डेहनकर, भास्कर पराड यांच्यासह प्रत्येक गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salil Deshmukh was on the verge of victory