esakal | समित ठक्करला जामिन मिळताच मुंबई पोलिसांकडून अटक, मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका
sakal

बोलून बातमी शोधा

samit thakkar arrested by mumbai police

शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांनी समित ठक्करविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. समितने अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, २० ऑक्टोबरला न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

समित ठक्करला जामिन मिळताच मुंबई पोलिसांकडून अटक, मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मुख्यंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत ट्विट केल्याप्रकरणी भाजपाच्या आयटी सेलचा तथाकथित सदस्य समित ठक्करला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयातून जामीन मिळाला असून मुंबई पोलिसांनी न्यायालयाला त्याच्या अटकेची मागणी केली. न्यायालयाने हिरवा कंदील देताच समित ठक्करला परत अटक करून मुंबईला नेण्यात आले.

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांनी समित ठक्करविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. समितने अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, २० ऑक्टोबरला न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याला राजस्थानमधील राजकोटमधून अटक केली होती. न्यायालयाने त्याला २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी समितला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम. व्ही. भराडे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने समितला सशर्त जामीन मंजूर केला होता. 

हेही वाचा - खुर्चीसाठी प्रवास 'खर्च'; स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत रंगणार...

अटकेचा केला विरोध -
मुंबई पोलिसांनी न्यायालयातून अटक करण्याची परवानगी मागितली. तेव्हा बचाव पक्षाच्या वकिलांनी अटकेचा जोरदार विरोध केला. मुंबईत कोरोनाचा धोका असल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाने समितला अटक करण्याची परवानगी दिली. सदर पोलिस ठाण्यात एंट्री करीत मुंबई पोलिस समितला अटक करून रवाना झाली.