esakal | मृत्यूला कवटाळताना दिले तिघांना जीवदान, वडिलांना सांगतानाही अश्रू आवरेना

बोलून बातमी शोधा

sandeep mahajan donate organ to three people in nagpur}

संदीप महाजन यांना मागील सहा दिवसांपूर्वी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने २४ फेब्रुवारीला संदीपच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे नातेवाइकांना सांगितले.

मृत्यूला कवटाळताना दिले तिघांना जीवदान, वडिलांना सांगतानाही अश्रू आवरेना
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाने गुरुवारी (ता.२५) मृत्यूला कवटाळताना अवयवदानातून तिघांना जीवनदान देत समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष असे की, जळगाव येथील निपाणी गावातील संदीप हा शेतकरी पुत्र आहे. 

संदीप यांच्या यकृत दानातून ६० वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला. एका किडनी दानातून ५२ वर्षीय व्यक्तीला तर दुसरी किडनी वर्धेतील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा जीव वाचवला. संदीपच्या अवयवदानाला न्यू इरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अखेरचा निरोप देताना सलाम केला. संदीपचे पिता रामदास यांनी लेकराने मरतानाही तिघांना जीवन दान दिले ही प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नाही. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

संदीप महाजन यांना मागील सहा दिवसांपूर्वी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या आजारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने २४ फेब्रुवारीला संदीपच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे नातेवाइकांना सांगितले. दरम्यान डॉ. अश्विनी यांनी केलेल्या समुपदेशनातून संदीपची पत्नी मोनाली महाजन यांचे समुपदेशन केले. पतीचे अवयवदानाचा निर्णय होताच विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांच्यासह वीणा वाठोरे यांनी अवयवाच्या प्रतिक्षा यादी तपासली असता. ६० वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतिक्षेत असल्याचे समजले. तत्काळ संपर्क साधला. न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. निधिश मिश्रा यांच्या नेतृत्वात डॉ. राहुल सक्सेना डॉ. स्नेहा खाडे, डॉ. अश्विनी चौधरी यांनी यकृत तर किडनी प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या ठिकाणी डॉ. संजय कोलते यांच्या पथकाने प्रत्यारोपण केले. डोळे माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले. 

३६ यकृत प्रत्यारोपण न्यू इरात - 
अडिच वर्षात नागपुरात ४२ यकृत प्रत्यारोपण झाले. यापैकी ८३ टक्के अर्थात ३६ प्रत्यारोपण न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये झाले. याशिवाय २५ किडनी प्रत्यारोपण येथे झाले आहेत, असे ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले. 

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

८८ किमीचा प्रवास ५५ मिनिटांत 
पोलिस दलाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग अवाढ यांच्या सहकार्याने नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलपासून तर वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रूरल हॉस्पिटल असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. ८८ किलोमीटरचे अंतर अवघ्या ५५ मिनिटांत कापण्यात रुग्णवाहिकेला यश आले. यानंतर येथे किडनीच्या प्रतीक्षेतील ३५ वर्षीय युवकाला किडनी दान करण्यात आला. यासाठी पोलिस दलातील दत्तात्रेय लांडगे, पोलिस निरीक्षक हेमंत उरलाग्लोंडावार, पोलिस निरिक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरिक्षक संजय जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक, सह आयुक्त अजय मालविय, एपीआय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तिवारी, एपीआय किशोर सातवकर यांच्यासह ९० पोलिसांचा ताफा या रस्त्यावर तैनात करण्यात आला होता.