कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर देशातील नव्वदहून अधिक संघ शिक्षा वर्ग रद्द

Dr. Vaidya
Dr. Vaidya

नागपूर : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील सर्व शाखा आणि सामुहिक व सार्वजनिक उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या कार्यपद्धतीत कार्यकर्ता निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून संघ शिक्षा वर्गाकडे बघितले जाते, हे संघशिक्षावर्ग कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर रद्द करण्यात आल्याचा निर्णय सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी जाहीर केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी एप्रिल ते जून या दोन महिन्यांत संपूर्ण देशात संघशिक्षावर्गाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही 90 हून अधिक संघ शिक्षा वर्गांचे आयोजन करण्यात येणार होते, मात्र सध्याची आरोग्य आणीबाणी लक्षात घेता हे संघशिक्षावर्ग रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नागपुरात होणाऱ्या तृतीय संघ शिक्षा वर्गाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. तो वर्गही रद्द करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. आणीबाणीचा काळ सोडला तर संघाच्या इतिहासात असे प्रथमच घडते आहे. सद्यस्थितीकडे बघता संघ शिक्षा वर्गासह देशातील सर्वच नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

25 लाखाहून अधिक लोकांना सहकार्य

संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात संघस्वयंसेवकांनी सुमारे 25 लाखाहून अधिक लोकांना सहकार्य केले आहे. गरजू व निराधारांना अन्नधान्य, जीवनावश्‍यक वस्तूंसह आरोग्यसेवेअंतर्गत सहाय्य करण्यात येत असल्याचे  डॉ. मनमोहन वैद्य यांनी नमूद केले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com