नागपुरातील या भागातील शाळा होणार कारागृह, वाचा काय आहे प्रकार 

नीलेश डोये
मंगळवार, 16 जून 2020

नागपूरमध्ये मध्यवर्ती कारागृह इंग्रज काळापासून आहे. कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी तीन ते चार बॅरेक आहेत. यात हजारोंच्या संख्येने कैदी आहेत. येथील पोलिस कर्मचारी, कैदी, न्यायालयीन बंदींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शहरात आणखी एक कारागृह तयार करण्यात येत आहे. अजनी परिसरातील एका शाळेला कारागृह करण्यात येणार आहे. हे कारागृह तात्पुरत्या स्वरूपाचे असून, नव्या कैद्यांना येथे ठेवण्यात येईल. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रोज डझनभरच्या वर नवे रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. उद्योग, दुकाने सुरू करताना याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. नुकतेच एका कारखान्यावर कारवाई करण्यात आली. 

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स
 

काही दुकानांनाही दंड ठेठावण्यात आला. कोरोनाचा संसर्गचा धोका व कारागृहातील संख्या पाहता अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. नागपूरमध्ये मध्यवर्ती कारागृह इंग्रज काळापासून आहे. कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी तीन ते चार बॅरेक आहेत. यात हजारोंच्या संख्येने कैदी आहेत. येथील पोलिस कर्मचारी, कैदी, न्यायालयीन बंदींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. 

लॉकडाउन उठवल्यानंतर गुन्ह्यांच्या घटनात वाढ झाली. चोरी, खुनाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून आरोपींना पकडण्यात येत असून, यातील अनेकांना न्यायालयीन कोठडी पाठविण्यात येते. यामुळे कारागृहातील कैद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ही संख्या जास्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नवीन कारागृहाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी अजनी भागातील एका शाळेचे कारागृह होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 जूनपर्यंत किंवा शाळाचे सत्र सुरू होईपर्यंत येथे कैद्यांना ठेवण्यात येणार असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school in Ajni will be a prison against the backdrop of Corona