esakal | सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Sushant sing always have a tablet box

अभिनेता सुशात सिंग राजपूतची आत्महत्या. हे वृत्त सोशल मीडियावर झळकले. वणवा पसरावा तसे वेगाने देशभर पसरले. त्याच्या चाहत्यांना तर जबर धक्का बसला. अनेकांचा या धक्कादायक बातमीवर अजून विश्‍वासच बसला नाही. मिळेल त्या माध्यमातून ते खात्री करून घेत आहेत. एक छोटा कलावंत म्हणून "टीव्ही'वरून त्याची कारकीर्द सुरू झाली. परंतु, प्रचंड मेहनत आणि अपार कष्टाने अल्पावधीतच मोठ्या पडद्यावरचा नायक म्हणून त्याने ओळख मिळविली. टीव्ही ते मोठा पडदा अशी भरारी घेत असताना त्याने स्वतःबाबत काही रहस्य उलगडे होते.

सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

नागपूर : सुशात सिंग राजपूतची अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू झाल्यानंतर त्याला एका टीव्ही वाहिनीवर "पवित्र रिश्‍ता' ही टीव्ही मालिका मिळाली. "डेली सोप' ची लोकांमध्ये प्रडंच क्रेझ नुकतीच सुरू झाली होती. त्यातच राजबिंडा असलेल्या सुशात सिंगची यातील भूमिका भाव खावून गेली. तो तरुणींच्या गळ्यातील ताईतच झाला होता. याच मालिकेत त्याच्या अपोझिट भूमिका असलेली अंकिता लोखंडेसोबतच्या त्याच्या रिलेशनची सुरुवातही चांगलीच चर्चेत आली. अंकिता आणि सुशात सिंग यांची जोडी या मालिकेच्या माध्यमातून सुपर-डुपरहिट झाली. याच काळात सुशात सिंग याने त्याचे एक बिंग पत्रकारांजवळ उघड केले होते.

जाणून घ्या - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून

पवित्र रिश्‍तामध्ये सुशात आणि अंकिता यांच्या लग्नाचे शुटिंग ठरले होते. या शुटिंगला देशभरातील मीडियातील "पेज थ्री' च्या पत्रकारांना खास निमंत्रण देण्यात आले होते. हे शुटिंग बघितल्यानंतर सुशांत आणि अंकिता यांच्यासोबत पत्रकांसोबत चर्चाही ठेवण्यात आली होती. त्याचे अंकितासोबतचे संबंध, या मालिकेतील त्याची भूमिका, याविषयी तो भरभरून बोलला होता. मालिकेसाठी त्याला किती मानधन मिळते, असाही प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी आमच्यासारख्या नवख्या कलावंतांना तीस हजार रुपये प्रति शिफ्ट मिळतात, असे त्याने सांगितले होते. जे सिनिअर कलावंत आहेत, त्यांना प्रति शिफ्ट साठ हजार रुपये वगैरे मिळतात, अशी माहिती त्याने त्यावेळी दिली. त्यावेळी सुशातसिंगच्या हाती एक डबा होता. तो डबा हाती ठेवूनच तो बोलत होता. पत्रकारांना या डब्याविषयी उत्सुकता वाटली...मग मात्र त्यांनी न राहावून विचारलेच. त्यावेळी सुशांत सिंगने दिलेले उत्तर सर्वच पत्रकारांच्या भुवया ताणून धरणारे होते...काय दिले होते त्याने उत्तर..

हेही वाचा - अनलॉकमध्ये कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मात्र मरेन, कोण म्हणालं असं...

सुशांत सिंग याने त्याच्या हातात असलेल त्या डब्याचे बिंग फोडले. तो म्हणाला, ही माझ्या करिअरची तशी सुरुवातच आहे. मला खूप मजल गाठायची आहे. त्यामुळे मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. इथले आटोपले की आणखी दुसऱ्या स्टुडिओमध्ये शुटिंगसाठी जातो. अठरा-अठरा तास काम करावे लागते. त्यामुळे झोपेचा प्रचंड त्रास होतो. या टॅबलेट्‌समुळे ताजे आणि उत्साही राहण्यासाठी मदत होते. मधूनमधून मी टॅबलेट्‌स घेतो.

तरुणींचा आवडता नायक

स्वतःच्या करिअरबाबत इतका सेंसेटिव्ह असलेल्या या अभिनेत्याने पुढे खूप मोठी झेप घेतली. "एम. एस. धोनी' सिनेमातून तर त्याने जबरदस्त अभिनय केला. "शुद्ध देसी रोमांस'मधून त्याने केलेल्या चॉकलेटी हिरोच्या भूमिकेमुळे तर तो तरुणींचा आवडता नायक बनला होता. त्याच्या जाण्यामुळे या सर्वांना जबरदस्त धक्का बसला, हे मात्र खरे.

loading image
go to top