शिक्षणाचा "घो'; शिक्षकाविनाच चालते शाळा !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

येथील समस्यांकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष वेधले; परंतु दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे पालकांनी उद्यापासून (ता.23) शाळेला टाळे लावण्याचा दिलेला इशारा अमलात आणण्याचा निर्धार केला आहे.

नांद/भिवापूर ः बेवारिस स्थितीत बसून शिक्षणाचे धडे घेताना विद्यार्थी.

नांद/भिवापूर (जि.नागपूर) : भगवानपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ना पुरेसे शिक्षक आहेत, ना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. येथील समस्यांकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष वेधले; परंतु दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे पालकांनी उद्यापासून (ता.23) शाळेला टाळे लावण्याचा दिलेला इशारा अमलात आणण्याचा निर्धार केला आहे.
क्‍लिक करा : एक काळ होता टी.चंद्रशेखर यांचा, आता आलेत टी.मुंडे
 

भगवानपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. 136 विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते पाचवीपर्यंत 79 विद्यार्थी आहेत. त्यामागे तीन शिक्षक कार्यरत आहेत. परंतु, वर्ग सहावी व सातवीत एकूण 57 विद्यार्थी असूनसुद्धा आठवड्यातील तीन दिवस एकही शिक्षक शिकविण्यासाठी कार्यरत नाही. वास्तविक एक भाषा शिक्षक आणि एक गणित, विज्ञान शिक्षक असे दोन शिक्षक सहावी, सातवीसाठी असायला पाहिजे. परंतु, एक गणित शिक्षक यांचा जिल्हा परिषद हायस्कूल जवळी येथे तीन दिवसांचा आदेश असल्यामुळे ते तीन दिवस जवळीला जातात.

क्‍लिक करा   : पालकांनो सांभाळा आपल्या मुलांना ! अन्यथा...

विद्यार्थिसंख्या 136, भगवानपूर शाळेला ग्रामस्थ ठोकणार कुलूप
सहावी ते सातवीला शिकविण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत "सकाळ'मधून वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले. तसेच पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. मात्र, कुठलेही आश्‍वासन मिळाले नाही. त्यामुळे उद्या (ता. 23) शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे निर्णय घेता न आल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश लेदे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी दिलीप भगत यांनी या विषयावर बोलण्याचे टाळून शिक्षण विभागाकडे बोट दाखविले. शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत विभागप्रमुखांनी दुर्लक्ष करण्याची बाब खटकणारी आहे.

दखल घ्यायला कुणी तयार नाही
पुरेशा वर्गखोल्या, शिक्षक नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत भिवापूर पंचायत समिती व नागपूर जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला; परंतु कुणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे नाइलाजास्तव शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
-पवन बेदरकर,
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School runs without teachers!