
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे कर्मचारी अर्थात सेवादूत यांच्या काही दिवसांच्या सेवेनंतर त्यांचे विलगीकरण केले जाते. यावेळी वेगळे राहण्याची सोय प्रशासनाने केली आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी येथे जेवणाचा निकृष्ट दर्जा असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. मात्र, प्रशासनाकडून डॉक्टरांपासून तर परिचारिका व आरोग्य दूत यांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असून, जाणीवपूर्वक प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जेवणाच्या दर्जावरून प्रशासन आणि सेवादूत आमने-सामने आले आहेत.
उपराजधानीतील दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अल्पकाळात रुग्णांची संख्या हजारावर पोहचली. उत्तम आरोग्यसेवेमुळे आतापर्यंत 625 रुग्ण बरे झाले असे मेडिकल, मेयो आणि एम्सच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र मेडिकलमध्ये सलग 15 दिवस कोरोना वॉर्डात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून 14 दिवस स्वतंत्र राहण्यासाठी सोय प्रशासनने मेडिकल कॅम्पस परिसरात एका वसतिगृहात केली आहे. रविवारी काही कर्मचाऱ्यांनी पोळी मिळाली नसल्याची तक्रार करीत जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
मेडिकल प्रशासनाकडून येथे डॉक्टर,परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासाची सोय वसतिगृह व इतर वास्तूंमध्ये केली आहे. या कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे जेवण मिळावे म्हणून बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवण्यात येते. आठवड्यात काही दिवस मांसाहार करणाऱ्यांना मटण, चिकनही उपलब्ध करून दिले जाते. परंतु रविवारी काहींनी अचानक निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार व्हिडिओतून मांडली.
विलगीकरणातील कर्मचाऱ्यांना ठेवलेल्या वास्तूत नियमबाह्यपणे मद्यपार्टी करण्यात आल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून असे अनुचित प्रकार मेडिकलमध्ये घडू नये म्हणून प्रशासनाने बाहेरच्यांना विलगीकरणातील कर्मचाऱ्यांजवळ पोहचता येऊ नये असा नियम केला. त्यामुळे रागाच्या भरात काहींनी जाणीवपूर्वक प्रशासनाला बदनाम करण्याचा हा प्रकार केला असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. नेमके काय घडले? याची चौकशी करण्यात येईल, असेही प्रशासनाने सांगितले.
आरोप तथ्य नाही
कोविडविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, परिचारिका यांच्यापासून तर परिचर, सफाई कामगार सारेच सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी प्रशासनाने विलगीकरणाचा पर्याय दिला. विशेष असे की, समान आणि उत्तम दर्जा असलेले जेवण त्यांना मेडिकलकडून उपलब्ध करून दिले जाते. खासगी खानावळीचे डबे लावले आहेत. वैद्यकीय अधिकारी, मार्डचे पदाधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत. यामुले निकृष्ट जेवण मिळत असलेल्या आरोपात कवडीचेही तथ्य नाही.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.