आई-वडील बघत होते खेळायला गेलेल्या एकुलत्या एक मुलाची वाट; फोन येताच फोडला टाहो

seventh class children died in accident in wadi of nagpur
seventh class children died in accident in wadi of nagpur

नागपूर : भरधाव कारने सात वर्षीय मुलाला चिरडले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वाडी बायपास रिंग रोडवर घडली. वंश विकास तिरपुडे (जगदिशनगर), असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास तिरपुडे हे एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा वंश हा मनपाच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी होता. तो मंगळवारी दुपारी अडीच वाजता मित्रांसोबत फिरायला गेला होता. तो वाडी बायपास रिंगरोडवरील अभिनंदन ट्रेडर्ससमोरील रस्त्याने जात असताना वंशला अज्ञात कारने धडक दिली. अपघातानंतर वंश गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात -
अपघात झालेल्या रस्त्यावरील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. तसेच काही दुकानातीलही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजवरून अपघात करणाऱ्या कारचा आणि चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com