शिवसेना ब्रेकिंग : शहरप्रमुखावर लाच घेतल्याचा आरोप; जिल्हाप्रमुखाचेही नाव गोवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचेही नाव या निमित्ताने चर्चेत आले आहे. तक्रारकर्त्याने आता माघार घेतली असली तरी त्याच्या विरोधात मानहानीचा दावा जाधव दाखल करणार आहे. तक्रारदार अशोक धापोडकर शिवसेनेचे माजी पदाधिकारी आहे.

नागपूर : शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश कडव यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप शिवसेनेचेच माजी पदाधिकारी अशोक धापोडकर यांनी केला आहे. धापोडकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. परंतु, त्यांनी तक्रार मागे घेतली. यामध्ये जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचेही नाव गोवण्यात आले आहे. याविरोधात न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा करण्यात येणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

मंगेश कडव यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचेही नाव या निमित्ताने चर्चेत आले आहे. तक्रारकर्त्याने आता माघार घेतली असली तरी त्याच्या विरोधात मानहानीचा दावा जाधव दाखल करणार आहे. तक्रारदार अशोक धापोडकर शिवसेनेचे माजी पदाधिकारी आहे.

जाणून घ्या - प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?

बुधवारी त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार करून शहरप्रमुख कडवे यांनी जिल्हाप्रमुखपदावर नियुक्त करण्यासाठी 25 लाख घेतल्याचा आरोप केला आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते, असेही धापोडकर यांनी सांगितले. यामुळे शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रमुखांच्या सांगण्यावरून हे सगळे झाले होते असा त्यांचा दावा आहे.

हा प्रकार उघडकीस येताच काल शिवसेनेच्यावतीने तातडीने पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावण्यात आले. उमेदवारी देणे आपले काम नाही. निवडणुकीच्या काळात संघटनेसाठी धापोडकर यांच्याकडून आर्थिक मदत घेण्यात आली. गडचिरोलीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर धापोडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांना परत यायचे असल्याने ते अशा प्रकारे दबाव टाकत असल्याचे कडव यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख राजू तुमसरे, किशोर ठाकरे आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

सुमारे 35 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करीत आहे. आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. या प्रकरणाशी कुठलाच संबंध नाही. आरोप लावणाऱ्याने पहिले आपले चरित्र बघावे. या विरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. स्वतः धापोडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे आपला या प्रकरणाची संबंध नसल्याचे जाहीर केले असल्याचेही प्रकाश जाधव यांनी सांगितले.

तक्रार घेतली मागे

जिल्हाप्रमुख पदावर नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश कडव यांनी लाच मागीतल्याचा आरोप शिवसेनेचेच माजी पदाधिकारी अशोक धापोडकर यांनी केला आहे. तसेच धापोडकर यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. परंतु, त्यांनी तक्रार मागे घेतली. तक्रार मागे घेतली असली तरी प्रकाश जाधव अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena turbulence over allegations of taking bribe