अरे हे काय, कार्यालयाच्या वऱ्हांड्यातच थाटले चक्क स्कूटर स्टॅंड

केवल जीवनतारे
Tuesday, 29 September 2020

राज्य कामगार विमा योजनेच्या या वैद्यकीय प्रशासकीय कार्यालयात विदर्भातील कामगार विमा योजनेचे मध्यवर्ती मेडिकल स्टोअर आहे. येथून विदर्भातील डिस्पेन्सरीमधील कर्मचारी औषधसाठा घेण्यासाठी येथे येतात. येथून औषधांचा साठा घेऊन जातात. ते कर्माचारीदेखील येथे वाहन आणल्यानंतर थेट इमारतीमध्ये ठेवत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारकर्त्याने सांगितले.

राज्य कामगार विमा योजनेच्या इमामवाडा कार्यालयातील प्रकार 

नागपूर : राज्य कामगार विमा योजनेच्या इमामवाडा येथील मेडिकल स्टोअरच्या भिंतींना तडा गेला आहे. हे स्टोअर दहा वर्षांपासून याच इमारतीत असून, वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील येते. कधीही जीवहानी होण्याची भीती असताना अद्यापही या विभागाला शहाणपण सुचले नाही. जीर्ण बांधकाम न पाडताच मेडिकल स्टोअर सर्रास सुरू आहे. यात भरीस भर म्हणून बाजूलाच प्रवेशद्वारातून कार्यालयात प्रवेश केल्यानंतर येथे अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने ठेवलेली दिसतात. राज्य कामगार विमा योजनेचे इमामवाडा येथील वैद्यकीय प्रशासन कार्यालयाला स्कुटर स्टॅंन्डचे स्वरूप आले आहे. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

राज्य कामगार विमा योजनेच्या इमामवाडा येथील वैद्यकीय प्रशासन कार्यालायासमोर संरक्षक भिंत बांधली आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. या जागेत स्कुटर, सायकल न ठेवता या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात दुचाकी वाहन ठेवतात. येथील कर्मचाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर उर्मटपणे उत्तरे दिली जात असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली आहे. 

राज्य कामगार विमा योजनेच्या या वैद्यकीय प्रशासकीय कार्यालयात विदर्भातील कामगार विमा योजनेचे मध्यवर्ती मेडिकल स्टोअर आहे. येथून विदर्भातील डिस्पेन्सरीमधील कर्मचारी औषधसाठा घेण्यासाठी येथे येतात. येथून औषधांचा साठा घेऊन जातात. ते कर्माचारीदेखील येथे वाहन आणल्यानंतर थेट इमारतीमध्ये ठेवत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर तक्रारकर्त्याने सांगितले. राज्य कामगार रुग्णालयातील अनेक कर्मचारी येथे येतात, त्यांना मात्र वाहन बाहेर ठेवण्याचे आदेश दिले जातात. असेही सदर व्यक्तीने तक्रारीत नमूद केले. 

दुचाकी वाहन बाहेर ठेवण्यात यावे 

राज्य कामगार विमा योजनेच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीत ठेवण्यात येणाऱ्या दुचाकी बाहेर ठेवाव्या, अशी मागणी इंटकतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन लवकरच आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत दुचाकी वाहन बाहेर ठेवण्याचे आदेश न दिल्यास राज्य कामगार विमा योजनेचे इमामवाडा येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा इंटकतर्फे देण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking : Scooter stand in the office