सीताफळांनी मिळतो म्हणे फायदाच फायदा

Silaflava says profit is profitable
Silaflava says profit is profitable

नागपूर : महागडी बी-बियाणे व मजुरी, निसर्गाचा लहरीपणा व शासनाच्या उदासीनतेमुळे परंपरागत शेती करणे सध्या तोट्यात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीऐवजी सीताफळासारख्या हमखास नफा मिळवून देणाऱ्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील शेतकरी सुनील ढोले त्याचे आदर्श उदाहरण आहेत. त्यांनी सीताफळांच्या माध्यमातून केवळ स्वत:चाच विकास साधला नाही, तर इतरही शेतकऱ्यांचे भले केले.


प्रकल्प संचालक कार्यालयातर्फे कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात सहभागी सुनील ढोले यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. यात दरवर्षी परंपरागत पिके घेत असल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी सीताफळाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. सीताफळ कमी पाण्यात येणारे व चांगला नफा देणारे पीक मानले जाते. त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. त्यांनी केवळ सीताफळांचे उत्पादनच केले नाही, तर त्यावर योग्य प्रक्रिया करून मिल्क शेक, ज्युस, चॉकलेट, सिरप, बासुंदी व लस्सीसारखे चविष्ट पदार्थही तयार केले. त्यांची ही दर्जेदार उत्पादने सध्या प्रदर्शनात नागपूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शेतातील सीताफळांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यातील तीन प्रकारांतील सीताफळांची थेट बाजारात विक्री होते. कमी दर्जाच्या चौथ्या फळापासून गर काढून विविध उत्पादने तयार केली जातात. सामूहिक शेतीवर विश्‍वास असलेल्या ढोले यांनी पाच-पन्नास शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक गट तयार केला. अवघ्या चार वर्षांत या गटात एक हजारावर शेतकरी जुळले. ते आकर्षक "पॅकिंग' करून माल बाजारात विकू लागले. विक्री व मार्केटिंग दोन्हींमध्ये कंपनीतर्फे त्यांना मदत मिळू लागली. ढोले यांनी यशाचा मंत्र अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही दिला. आजच्या विपरीत परिस्थितीत कोरडवाहू शेतीही यशस्वी केली जाऊ शकते. त्यासाठी थोडी "रिस्क' आणि धाडसी प्रयोगांची आवश्‍यकता असते, असे ढोले यांच्या या प्रयोगातून सिद्ध होते.

कुठलेही नवीन व लोकांच्या भल्याचे काम हाती घेतले की, लोक नावे ठेवतात. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत राहिल्यास नावे ठेवणारेच नंतर मागे धावतात. या तत्त्वानुसार आम्ही कामाची सुरुवात केली. न थांबता ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. त्याचे फळ मला व माझ्या शेतकरीबांधवांना मिळत आहे.
-सुनील ढोले, शेतकरी, कारंजा घाडगे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com