हे मजूर काय म्हणतात, साहाब, घरवालों की याद बहुत आ रही हैं !

 केळवद ः भीमराव बापू आदर्श विद्यालयात थांबविण्यात आलेले परप्रांतीय मजूर.
केळवद ः भीमराव बापू आदर्श विद्यालयात थांबविण्यात आलेले परप्रांतीय मजूर.

केळवद (जि.नागपूर) :  कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीमुळे आपल्या गावी परत न जाऊ शकलेल्या 75 मजुरांची व्यवस्था येथील भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालयात प्रशासन आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने केली आहे. आजार नसताना एका ठिकाणी अडकून पडल्यामुळे घरची आठवण आलेले मजूर काकुळतीने म्हणतात की, साहाब, हमे घर जाने दिजीये, घरवालों की याद बहुत सता रही हैं.

केळवदच्या विलगीकरण केद्रांतील मजुरांना स्वगावाची ओढ
या विलगीकरण केंद्रात या परप्रांतीय मजुरांना राहण्यासोबत सकाळी चहा, नाश्‍ता, दोन वेळा जेवण तसेच मनोरंजन व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. आता या केंद्रात मागील 14 दिवसांपासून अधिक काळ येथे मजूर आहेत. यात महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यावर येथे सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने दररोज तपासणी होत असल्याने या मजुरांत अद्याप कोणीही कोरोना संसर्ग आजाराचे संशयित रुग्ण नसल्याने या मजुरांची स्वगृही परतण्याची इच्छा प्रबळ होत आहे. संचारबंदीमुळे देशात, राज्यात अनेक उद्योग झाले. या उद्योगात काम करणारे हजारो कामगार बेरोजगार झालेत. अशात हाताला काम नसल्याने स्वगावी जायचे, तर वाहतूक व्यवस्थाही बंद. जिल्हा, राज्याच्या सीमा बंद अशा परिस्थितीत अडकलेल्या अनेक मजुरांनी आपले घर गाठण्यासाठी मग पायपीट सुरू केली. जत्थेच्या जत्थे आपल्या गावी जाण्याकरिता निघाल्याने ऐनवेळेवर या मजुरांना जिथेच्या तिथेच थाबंण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याने परप्रांतीय मजुरांचे स्थलातंर थांबणे शक्‍य झाले. या स्थितीत येथील भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालयाने मागील 14 दिवसांपेक्षा अधिक काळापासून येथे असणाऱ्या मजुरांना सकाळी चहा, नाश्‍ता, जेवण तसेच लहान मुलांना खेळायला खेळणी, इतर मनोरंजन सुविधा तसेच निवासाची व्यवस्था करीत या निराश्रितांना स्वत:च्या कुशीत समावून घेण्याचे काम या केद्रांवर नियंत्रण ठेवणारे, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, पोलिस अधीक्षक राकेश ओला, तहसीलदार दीपक करांडे, ठाणेदार सुरेश मट्टामी, मंडळ अधिकारी शरद नांदुरकर, मुख्याधापक उदयराव देशमुख यांनी अतिशय दिलदारपणे केले आहे.

घरची ओढ
येथे असणाऱ्या मजुरांना घरची ओढ लागल्याने, "साहब, आपने हमारे लिए बहुत कुछ किया, इन्सानियत क्‍या होती हैं, हमे अच्छे से मालुम हुवा, लेकीन हमे कोई बिमारी ही नहीं हैं, तो आप हमारे लिए ज्यादा कष्ट न करे, हमे हमारे घर जाने दिजिये, घरवालों की याद बहुत आ रही हैं' अशी भावनिक मागणी या मजुरांनी केली. या केद्रांवर 14 दिवसांपेक्षा अधिक काळ या मजुरांना झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधून या मजुरांची रवानगी त्यांच्या राज्यात करण्याचे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे. यातील काही मजूरांनी विलगीकेंद्रातून पळ काढल्याचे कळते.



 

सदयातरी शक्‍य नाही !
30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढल्याने तसेच अद्याप कोणताच आदेश न आल्याने या केद्रांवर असलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविणे सध्यातरी शक्‍य नाही.
-दीपक करांडे
तहसीलदार, सावनेर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com