"हया' तालुक्‍यातील परिस्थिती आणली नियंत्रणात, कोविड योद्‌ध्यांनी घेतले परिश्रम...

अजय धर्मपुरीवार
रविवार, 12 जुलै 2020

गेल्या महिनाभरात हिंगणा तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण 94 वर पोहोचली. नागपूर जिल्हयातील हिंगणा तालुका "हॉटस्पॉट' ठरला. परंतू प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनातून परिस्थिती नियंत्रणात आली. यामागचे खरे सुत्रधार "हे' कोविडयोद्‌धे आहेत...

हिंगणा (जि.नागपूर) : औद्योगिक क्षेत्र असलेल्या हिंगणा तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या 94 च्या घरात पोहोचली. परिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. समितीतील अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पडल्याने सद्यस्थिती तालुक्‍यात नियंत्रणात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा : सीआयडी चौकशीस कारण की...

कोविड योद्‌ध्यांची सजगता
हिंगणा तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगरमधून झाला. यानंतर अमरनगर, पारधी नगर, भीमनगर, कोतेवाडा, येरणगाव, मोंढा, वानाडोंगरी परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले. कॅंटोन्मेंट झोन तयार झाले. कोरोनाबाधित रुग्ण व संपर्कात आलेल्या रुग्णांना उपचारासाठी केअर सेंटर वानाडोंगरी येथे ठेवण्यात आले. कोवीड-19 मध्ये उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, समितीचे तालुका सचिव उपविभागीय अभियंता कृष्णमोहन राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकांत घोडेराव, तहसीलदार संतोष खांडरे, गटविकास अधिकारी महेंद्र जुवारे नायबज तहसीलदार महादेव दराडे यांच्यासह तालुका आरोग्य विभागातील सर्व डॉक्‍टर व परिचारिका व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

अधिक वाचा : बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या नव्या सूचना जाहीर वाचा ...

प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम
कोरोना संक्रमणाच्या काळात उपविभागीय अभियंता कृष्णमोहन राव व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी कोरोनाबाधित क्षेत्र पिंजून काढले. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. सर्व रुग्णांची जेवणाची राहण्याची व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. याकरीता तालुका आरोग्य विभागाने मोलाची कामगिरी बजावली. प्रतिबंधित क्षेत्र "सी' लिंक करण्यासाठी ऐनवेळी उपविभागीय अभियंता कृष्णमोहन राव यांना धावपळ करावी लागली. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 94वर स्थिरावली आहे. एमआयडीसी परिसर "हॉटस्पॉट' झाल्याचा आरोप झाला होता. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कोरोना परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणली आहे.

अधिक वाचा: यांचाही होतो वाढदिवस...

जनतेनेही सहकार्य केले
उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी वारंवार तालुक्‍याला भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विभागीय आयुक्त संजीव कुमार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे त्यांनी पाहणी दौरा केला. हिंगणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सारीन दुर्गे व त्यांची चमूने दिवसरात्र बंदोबस्त पाळला. एमआयडीसीचे ठाणेदार हेमंत कुमार खराबे यांनीही आपली भूमिका चोख बजावली. पोलिस प्रशासनाने कोरोना संक्रमणाच्या काळात अहोरात्र जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावले. हिंगणा तालुक्‍यातील जनतेनेही प्रशासनाला चांगले सहकार्य केले. यामुळे संकटातही कर्तव्यदक्ष अधिकारी तालुक्‍यात असणे गरजेचे आहे, याचे महत्त्व पटले. 

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation in Haya taluka was brought under control by Kovid warriors