वडील घरी आल्यानंतर चटकन पाण्याचा ग्लास घेऊन येणारी श्रृती आज धावत बाहेर आली नाही... 

अनिल कांबळे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

वडील ऑटो घेऊन घरी आले. त्यांनी बाहेर बसून ‘श्रृती पाणी दे गं मला...' असे म्हणून मुलीला पाणी आणण्यास सांगितले. परंतु, वडील आल्यानंतर चटकन हातात पाण्याचा ग्लास घेणारी श्रृती आज धावत बाहेर आली नाही. त्यामुळे वडिलांना चुकचुकल्यासारखे वाटले. 

नागपूर : पाळण्यावर झोके घेत असताना अचानक दोरी गळ्यात पडून गळफास लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. श्रुती प्रकाश गजभिये असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश गजभिये हे ऑटोचालक आहेत. त्यांची पत्नी सर्व्हंट कॉटरमध्ये काम करते. त्यांना १४ वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता श्रृती ही भावासोबत पाळण्यावर खेळत होती. खेळता खेळता पाळण्याची दोरी तिच्या गळ्याला गुंडाळली गेली. दोरीने गळफास लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार..

दरम्यान, तिचे वडील ऑटो घेऊन घरी आले. त्यांनी बाहेर बसून ‘श्रृती पाणी दे गं मला...' असे म्हणून मुलीला पाणी आणण्यास सांगितले. परंतु, वडील आल्यानंतर चटकन हातात पाण्याचा ग्लास घेणारी श्रृती आज धावत बाहेर आली नाही. त्यामुळे वडिलांना चुकचुकल्यासारखे वाटले. 

त्यांनी घरात जाऊन बघितले असता श्रृती गळफास लागलेल्या अवस्थेत पळून होती. वडिलाचे अवसान गळाले. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. श्रृतीला लगेच ऑटोत ठेवून रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्‍टरांनी श्रृतीला मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान ठाण्यातील पीएसआय मुकेश राठोड यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक माहितीसाठी - प्रादेशिक हवामान विभागाने दिला पुन्हा इशारा, धानपट्टा भागात होणार हे...

यापूर्वी दोन घटना

यापूर्वीही नागपुरात गळफास लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनाक लॉकडाउन सुरू असतानाच घडल्या. आई-वडिल किराणा दुकान सांभाळत असताना लहान मुलगा घरी एकटाच होता. त्याने दोरीने पाळना तयार केला आणि खेळू लागला. खेळता-खेळता गळ्याला फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत आई-वडील झोपले असताना तीन बहिणी गॅलरीत खेळत होत्या. अचानक दोरी गळ्यात फसल्याने मोठ्या बहिणीचा मृत्यू झला. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small girl death in Nagpur